aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Monday, November 9, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Monday, November 9, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
August 4, 2026
in क्राईम
0
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ४ जुलै (प्रतिनिधी माधव वाघमारे)

नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या निर्देशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत कंधार पोलीस ठाण्याच्या पथकाने विविध ठिकाणी छापे मारून मटका आणि जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली आहे. या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण २० आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून रोकड, मोबाईल आणि वाहनांसह १,४१,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहिली कारवाई: शेकापूर शिवारात छापा ३ ऑगस्ट २०२६ रोजी कंधार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेकापूर शिवारात उद्धव गुंड वाघमारे यांच्या शेताशेजारील जागेत जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी छापा टाकून ५ जणांना ताब्यात घेतले व २ जण फरार झाले.

  • आरोपी: शेख असपाक शेख समद (वय २६), अमेरा अयुब पठाण (वय २६), पवनकुमार लक्ष्मण राठोड (वय २७), मुकेश तुकाराम वाघमारे (वय २९), अनिल प्रकाश मुंडे (वय २६). तर मुनेश्वर बसवंते व उद्धव खंडू वाघमारे हे फरार आहेत.
  • जप्त मुद्देमाल: ३७,४०० रुपये रोख, १५,००० रुपयांचे ३ मोबाईल आणि ४०,००० रुपयांची एक मोटारसायकल असा एकूण ९२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  • दाखल गुन्हा: कंधार पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९४/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई: पवळे गल्लीत ‘तिरट’ जुगारावर छापा पवळे गल्लीतील मोकळ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी ‘तिरट’ नावाचा जुगार खेळला जात असल्याची बातमी मिळताच कंधार पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला.

  • आरोपी (सर्व रा. गोनार): पंढरीनाथ गणपती पवळे (वय ४९), सुभाष नारायण सूर्यवंशी (वय ४५), लक्ष्मण व्यंकटी डुबुकवाड (वय २५), मुख्तार मौलासाब फकीर (वय ३६), संभाजी भुजंगा कांबळे (वय ३३), आनंदा नागोराव पवळे (वय ६४), अशोक धोंडीबा डुबुकवाड (वय ५५), रावसाहेब रानबा पवळे (वय ४०), सोपान गणपती पवळे (वय ४२), गणेश कडाजी पवळे (वय ३७) व अब्बास इब्राहिम मुजावर (वय ४९) यांना ताब्यात घेण्यात आले.
  • जप्त मुद्देमाल: ४,८०० रुपये रोख, १०,००० रुपयांचे २ मोबाईल, ३०,००० रुपयांची स्कुटी आणि बदक छाप पत्ते असा एकूण ४४,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  • दाखल गुन्हा: कंधार पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९२/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तिसरी कारवाई: महाराणा प्रताप चौक ते घोडज रोड गस्त घालताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी महाराणा प्रताप चौक ते घोडज रोडवर मटका जुगार चालवणाऱ्यांवर छापा टाकला.

  • आरोपी: साहेबराव अंबादास राशीवंत (वय ३६, रा. पिंपळगाव नगर, कंधार) आणि नरसिंग बालाजी जेलेवाड (वय ३५, रा. इंदिरा नगर, लोहा).
  • जप्त मुद्देमाल: ४०० रुपये रोख, ४,००० रुपयांचे २ मोबाईल आणि मटका साहित्यासह ४,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  • दाखल गुन्हा: कंधार पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९३/२०२६, कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथकाची कामगिरी ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील जुमडे व पोलीस निरीक्षक अरविंद घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गुंडरे, साखरे, गणपती केंद्रे, टाकरस, डिकळे, गुंडरे, बलोरे, घुगे व शंकर कामवाड या अंमलदारांच्या पथकाने पार पाडली.

जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्धची मोहीम अशीच तीव्र राहणार असून, नागरिकांनी बेकायदेशीर कृत्यांची माहिती त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

Next Post

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात
क्राईम

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

November 4, 2026
१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल
क्राईम

१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल

November 4, 2026
मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका
क्राईम

मांडवी पोलिसांची मोठी कारवाई गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारे वाहन जप्त ०९ जनावरांची सुटका

November 3, 2026
वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा
क्राईम

वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा

November 3, 2026
गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनासह ०२ जनावरांची सुटका ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनासह ०२ जनावरांची सुटका ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

October 31, 2026
Next Post
यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved