📰
नांदेड, दि. १ ऑक्टोबर :-(प्रतिनिधी) समता नगर परिसरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बुद्ध विहार ते पत्रकार राजू जोंधळे यांच्या घरापर्यंत नवीन सीसी रस्ता तयार करण्यात येणार आहे. यासाठी आज प्रत्यक्षात रस्त्याचे मोजमाप पूर्ण करण्यात आले.
जुना रस्ता खोदकाम करून नवीन सीसी रस्ता बनविण्यात येणार असून, यामुळे नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर वाहतूक सुविधा मिळणार आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू होणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनी या कामाचे स्वागत केले असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होत असल्याचे समाधान व्यक्त केले आहे. 🛣️












