नांदेड दि. १ ऑक्टोबर :– नांदेड शासनाच्या सावकारी कायद्यानुसार विविध रकमेवर ठराविक व्याजदर निश्चित केलेले असून, सावकारी व्यवसाय करणाऱ्यांना त्यानुसारच कर्ज व्यवहार करण्याची परवानगी आहे. मात्र नांदेड शहरातील काही सावकार लायसनचा गैरवापर करत नागरिकांकडून तब्बल १५ टक्के ते २० टक्के इतक्या टोकाच्या व्याजदराने पैसे वसूल करत असल्याने नागरिक बरबाद होत आहेत काही लोकांचे व्यवसाय बंद झाले आहे ह्या लोकांना घाबरून बाहेर आपल्या परिवाराला सोडून जात आहेत उदाहरणार्थ वीस हजार घेतले असता त्यांचा व्याज महिन्याला तीन ३००० व ४००० हजार रुपये ठरविला जात आहे शासनाचा नियमाप्रमाणे कमी व्याजदर आहे हे कोणता कायदा आहे जर हे तीन हजार व चार रुपये महिन्याला दिले नाही तर त्यांना लगेच एका दिवसाला पाचशे रुपये Dev लागत आहे हे कोणचा कायदा आहे तर काही लोकांकडे तर लायसन्स सुद्धा नाही पैसे देऊन लोकांच्या घरांमध्ये लोक आणून धमकी व धाक दाखवून तुला घरातून उचलून घेऊन जाईल तर आजच्या आज आम्हाला पैसे दिले नाहीत तर अशी धमकी नागरिकांना देत आहेत या धमकेतून सामान्य नागरिक घरामध्ये परिवारावर भीतीचा निर्माण झालेला आहे असा कारभार नांदेड शहरांमध्ये चालत आहे तरी प्रशासनाने दखल घेऊन या लोकांना कायदेशीर कारवाई करावी.
यामुळे सर्वसामान्य कर्जदारांचे आर्थिक शोषण होत असून, कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या व्याजदरांच्या स्पष्ट तरतुदींना डावलून सुरू असलेल्या या बेकायदेशीर वसुलीविरोधात कारवाईची मागणी होत आहे.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून अनेकजण सावकारांकडे जातात; मात्र तिथेच त्यांच्यावर जादा व्याजाचा बोजा टाकला जातो. अशा पद्धतीने शेकडो नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून बेकायदेशीर सावकारीवर आळा घालावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
👉 नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, अशा प्रकारच्या अनधिकृत वसुलीबाबत त्वरित जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग किंवा संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी.












