aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांची धडक कारवाई ३ गंभीर गुन्ह्यांची उकल गुन्हेगारा मुसक्या आवळल्या

Aawaz Times by Aawaz Times
August 10, 2026
in क्राईम
0
नांदेड पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांची धडक कारवाई ३ गंभीर गुन्ह्यांची उकल गुन्हेगारा मुसक्या आवळल्या
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विशेष बातमी प्रतिनिधी – माधव वाघमारे

नांदेड १० ऑगस्ट जिल्ह्यात घडलेल्या तीन वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये नांदेड पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत जलद गतीने कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यांच्या पथकांनी अवघ्या काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

१. नांदेड ग्रामीण खुनाचा छडा; ५ आरोपी ताब्यात नांदेड ग्रामीण हद्दीतील धनेगाव येथे ०८ ऑगस्ट रोजी मोटरसायकल जप्त केल्याच्या वादातून व पूर्ववैमनस्यातून इंदरजितसिंह बावरी (वय २५, रा. कौठा) यांचा खंजराने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच एलसीबीच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.

तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी १) दिलीप पुंडलिक डाकोरे (वय ३३), २) कृष्णा दिगंबर बारोळे (वय २९), ३) रणजीत उर्फ रंज्या चांदू सूर्यवंशी (वय २३), ४) ज्योती जगदिश बिगानिया (वय ४०) आणि ५) एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह पाच जणांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

२. इतवारा येथील भंगार वेचणाऱ्याच्या खून प्रकरणात एकास अटक इतवारा हद्दीतील संगम कार बाजार परिसरात ०७ ऑगस्टच्या रात्री भंगार वेचणाऱ्या मयत मंगल शंकर गवळी (रा. लोंढे सांगवी, जि. नांदेड) यांच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखा व इतवारा गुन्हे शोध पथकाने संशयित आरोपी सुजल उर्फ सुजित सुनिल पोटभरे (वय २१, रा. श्रावस्तीनगर, नांदेड) याला ताब्यात घेतले आहे. दारूच्या नशेत भंगार वेचण्याच्या जुन्या वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

३. भाग्यनगर हद्दीत कौटुंबिक तणावातून आईचा खून व मुलाची आत्महत्या तरोडा भागातील राहुल कॉलनी येथे ०८ ऑगस्ट रोजी एक हृदयद्रावक घटना घडली. मानसिक तणाव व डिप्रेशनमध्ये असलेल्या प्रतीक बालाजी चौथरे (वय २६) या तरुणाने आपली आई भारती बालाजी चौथरे (वय ५०) यांच्यावर लोखंडी रॉड व चाकूने हल्ला करून त्यांचा खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पोलीस निरीक्षक महेश माळी पुढील तपास करत आहेत.

पोलीस पथकाची प्रभावी कामगिरी ही सर्व कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने आणि प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अतुल भोसले, रामेश्वर खनाळ, संजय शिंदे, सपोनि रवी वाघूळे, विठ्ठल घोगरे, गोविंद खैरे, पोउपनि साईनाथ पुयड, मिलींद सोनकांबळे, प्रविण आगलावे आणि एलसीबी/इतवारा/सायबर सेलच्या अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड मध्ये लोटस स्पा सेंटर च्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ४ पीडित महिलांची सुटका १ आरोपी जाळ्यात

Next Post

जिल्हा परिषदेत ११ ऑगस्टला लोकप्रिय गायिका मीरा भालेराव यांच्या भीमगीतांची संगीतमय मेजवानी सुजातदादा आंबेडकर यांच्या हस्ते होणार भव्य उद्घाटन

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक
क्राईम

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त
क्राईम

मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त

August 22, 2026
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत

August 21, 2026
Next Post
जिल्हा परिषदेत ११ ऑगस्टला लोकप्रिय गायिका मीरा भालेराव यांच्या भीमगीतांची संगीतमय मेजवानी सुजातदादा आंबेडकर यांच्या हस्ते होणार भव्य उद्घाटन

जिल्हा परिषदेत ११ ऑगस्टला लोकप्रिय गायिका मीरा भालेराव यांच्या भीमगीतांची संगीतमय मेजवानी सुजातदादा आंबेडकर यांच्या हस्ते होणार भव्य उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved