विशेष प्रतिनिधी (माधव वाघमारे) १० ऑगस्ट
नांदेड: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव-२०२६ चे औचित्य साधून नांदेड जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी, ११ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता जिल्हा परिषदेच्या प्रांगणात महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका मीरा भालेराव (मुंबई) आणि प्रसिद्ध गायक प्रवीण डोणे व रोहित उन्हवणे यांच्या भीमगीतांचा जल्लोषपूर्ण कार्यक्रम रंगणार आहे.
प्रमुख उपस्थिती व उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजातदादा आंबेडकर यांच्या शुभहस्ते या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे भव्य उद्घाटन केले जाईल.
या प्रसंगी विशेष शासकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे:
- राहुल कर्डिले (जिल्हाधिकारी, नांदेड)
- शहाजी उमाप (विशेष पोलीस महानिरीक्षक)
- डॉ. नीलभ रोहन (जिल्हा पोलीस अधीक्षक)
- महेशकुमार डोईफोडे (महापालिका आयुक्त)
प्रशासकीय अधिकाऱ्यांचे स्वागत या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, समाजकल्याण अधिकारी राजू एडके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, प्रकल्प संचालक मयूर आंदेलवाड, प्रशांत थोरात, अमित राठोड, कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, बालाजी पवार, व्ही. डी. चव्हाण, डॉ. सखाराम खुणे, डॉ. संतोष सूर्यवंशी, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे आणि डॉ. निलकुमार ऐतवडे हे सर्व अधिकारी स्वागतोत्सुक आहेत.
उपस्थित राहण्याचे आवाहन आंबेडकरी विचारांची उजळणी करणाऱ्या या भीमगीतांच्या संगीतमय पर्वाचा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा जिल्ह्यातील सर्व नागरिक, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे जाहीर आवाहन रणजीत गजभारे, राजेश जोंधळे, धनंजय गुम्मलवार आणि विजय वाघमारे यांच्या वतीने करण्यात आले आहे.












