नांदेड 04/06/2025 नांदेड जिल्ह्यात साजरा होणाऱ्या श्री गणेशोत्सव अनुषंगाने मा .श्री .अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता कमिटीच्या मिटींग बैठका घेण्याची प्रक्रिया चालू असून त्यात डीजे मुक्त श्री गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे मा श्री अधीक्षक नांदेड यांनी साजरा होणाऱ्या गणेश उत्सव डीजे मुक्त वातावरणात साजरा करण्याची केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रसिद्ध देत सिंदखेड पोलीस स्टेशन हद्दीत 1 श्री संत सावता माळी गणेश मंडळ 2 छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ 3 श्री समता गणेश मंडळ 4 श्री अष्टविनायक गणेश मंडळ 5 श्री अण्णाभाऊ साठे गणेश मंडळ 6 श्री शिवनेरी गणेश मंडळ 7 महालक्ष्मी गणेश मंडळ 8 जय श्री राम गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन यंदाची गणेशोत्सव मिरवणूक डीजे मुक्त वातावरणात काढण्याचा संकल्प करू पारंपारिक ढोल वाद्य जहाज पथक भजनी मंडळी यांच्या वापरास प्रोस्ताहन देण्यात निर्णय घेतला आहे तसेच सदर गणेश मंडळ पदाधिकारी यांची गणेश विसर्जनाचा मिरवणुका ह्या पोलीस बंदोबस्ताशिवाय शांततेत पार पाडणार बाबत सांगितले आहे सदर गणेश मंडळांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करून संबंधित मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या दिनांक 03/09/2025 रोजी मा श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी मंथन हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सत्कार केला व सन्मानपत्र देऊन गौरव केला न्यायालयाच्या सूचनेनुसार आणि डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचे प्रशासनाने चांगले नियोजन केले आहे नांदेड जिल्ह्यात सण उत्सव काळात शांतता राखून उत्तम नियोजन केले जाते सण उत्सव काळात विजेचा वापर न करता पर्यावरण पूरक उत्सव साजरे करून चांगला आदर्श निर्माण करता येतो उत्सव काळात गणेश मंडळांनी दिलेल्या सूचनेचे योग्य पालन करावे वेळेचे बंधन पाळावे सर्व धर्माचा आदर करून डीजे मुक्त गणेश उत्सव शांत प्रयोग साजरा करावा असे मा .श्री. अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी आव्हान केले आहे.












