aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, February 26, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, February 26, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

कायदा व सुव्यवस्थेसाठी नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

Aawaz Times by Aawaz Times
February 25, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी: माधव वाघमारे

नांदेड, दि. 25 फेब्रुवारी: नांदेड जिल्ह्यात येत्या 26 फेब्रुवारीपासून कडक शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू होत आहेत. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे आदेश २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेपासून १२ मार्च २०२६ रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.

अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत हे आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये, कोणत्याही सार्वजनिक परिसरात किंवा त्याच्या आसपास पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे किंवा आदेशात नमूद केलेली कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.

तथापि, या बंदी आदेशाला काही महत्त्वाचे अपवाद ठेवण्यात आले आहेत. हे आदेश कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी तसेच विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा यांसारख्या सामाजिक उपक्रमांना लागू होणार नाहीत. तसेच, या कालावधीत सभा, मिरवणुका, मोर्चे काढणे किंवा ध्वनीक्षेपक वाजविणे यासाठी विशेष परवानगीची आवश्यकता असेल.

पाच किंवा अधिक व्यक्ती जमण्यासाठी, मोर्चे व मिरवणुका काढण्यासाठी किंवा ध्वनीक्षेपक वाजविण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना राहतील. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि शांतता राखण्यास मदत करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी यंत्रणा एकजूट पीएम धन-धान्य योजने अंतर्गत डॉ. निधी पांडे यांचा सविस्तर आढावा रेशीम शेतीची पाहणी

Next Post

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात क्रीडा सन्मान सोहळा उत्साहात

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026
आपलं नांदेड

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026
आपलं नांदेड

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026
आपलं नांदेड

वेल्ड फेल्युअर आणि कोचमधील बिघाड रोखून केलेली कामगिरी अविस्मरणीय

February 24, 2026
आपलं नांदेड

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त महापौरांनी राबविली स्वच्छता मोहीम स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

February 23, 2026
आपलं नांदेड

घड्याळ हरवली नांदेड शहर ओळखणारा जुना मोंढा अकृषिक ठरा ओळखीचा

February 21, 2026
Next Post

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात क्रीडा सन्मान सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved