aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

केक खरेदीच्या बहाण्याने दुकानदाराला लुटणारे वजिराबाद पोलिसांच्या जाळ्यात दोन आरोपींना अटक एक फरार

Aawaz Times by Aawaz Times
August 11, 2026
in क्राईम
0
केक खरेदीच्या बहाण्याने दुकानदाराला लुटणारे वजिराबाद पोलिसांच्या जाळ्यात दोन आरोपींना अटक एक फरार
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ११ ऑगस्ट प्रतिनिधी

केक खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात शिरून दुकानदाराला शिवीगाळ व धाक दाखवून ४,५०० रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटणाऱ्या दोन आरोपींना वजिराबाद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे. ही घटना ९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी तक्रारदार हे आपल्या नेहमीप्रमाणे ‘केक हब’ दुकानात काम करत होते. रात्रीच्या सुमारास अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील तीन अनोळखी इसम स्प्लेंडर मोटारसायकलवरून दुकानात आले. त्यांनी केकाची मागणी करत फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता, आरोपींनी शिवीगाळ करत व धाक दाखवून फिर्यादीच्या खिशातील ४,५०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली आणि पोबारा केला. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३९७/२०२६, कलम ३०९(४), ३५१(२), ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासावरून आरोपी निष्पन्न घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशाने वजिराबादचे प्रभारी अधिकारी पोनि. अजित कुंभार यांच्या नेतृत्वात पोउपनि. सुनील बुलंगे व गुन्हे शोध पथकाने तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, आरोपी MH-26 CT-2947 या मोटारसायकलचा वापर करून आल्याचे निष्पन्न झाले.

तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेऊन खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले: १) तारू शेषेराव खिल्लारे (वय २६, रा. गोवर्धनघात टेकडी, नांदेड) २) अनिकेेत कालिदास खिल्लारे (वय २०, रा. बौद्ध विहार जवळ, गोवर्धनघात टेकडी, नांदेड)

या गुन्ह्यातील तिसरा आरोपी योगेश पि. ज्ञानेश्वर वाघमारे हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपींकडून जबरदस्तीने घेतलेली रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.

कामाची कामगिरी सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अजित कुंभार, सपोनि. प्रशांत लोढे, पोउपनि. सुनील बुलंगे तसेच अंमलदार शिवशांब मठपती, विलास कदम, ज्वालासिंग बावरी, संतोष पोकळे, संतोष पावडे, भाऊसाहेब राठोड आणि इम्रान पठाण यांच्या पथकाने केली.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या धमकी, जबरदस्ती किंवा लुटीच्या घटनेला न घाबरता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच व्यावसायिकांनी दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवावेत, जेणेकरून गुन्हेगारांचा शोध घेणे सोपे होईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

विशेष बातमी प्रतिनिधी: माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

कुंटूर पोलिसांचा तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा ५ आरोपींना अटक  ३ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई १४ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि इनोव्हा कार जप्त चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक
क्राईम

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त
क्राईम

मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त

August 22, 2026
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत

August 21, 2026
Next Post
नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई १४ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि इनोव्हा कार जप्त चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई १४ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि इनोव्हा कार जप्त चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved