नांदेड प्रतिनिधी २८ सप्टेंबर माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशान्वये विशेष शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणावर खंजीर, तलवार व दगडाने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या गंभीर गुन्ह्यातील सर्व ७ आरोपींना वजिराबाद पोलिसांनी तत्परतेने अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी मनोज प्रल्हाद माने (वय ३२ वर्षे, व्यवसाय: व्यावसायिक, रा. सोमेश कॉलनी, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी व जखमी शंकर माने हे दुचाकीवर साहित्य आणण्यासाठी जात असताना, देगांवचाळ येथील हार्डवेअर दुकानासमोर आरोपींनी त्यांना गाठले. “गणेश मंडळाजवळ जास्त बोलत होता, तुला आता खतम करून टाकतो” असे म्हणत आरोपींनी शंकर माने यांच्यावर खंजीर व तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी पोलीस ठाणे वजिराबाद येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४८८/२०२६ कलम १०९(१), १८९(१), १८९(२), १८९(४), १९१(३), १९०, ११८(१), ११५(२), ३५१(१), ३५१(२) भारतीय न्याय संहिता सहकलम ४/२५ शस्त्र अधिनियमन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची तत्पर कारवाई आणि सातही आरोपी जेरबंद
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शन व आदेशान्वये वजिराबाद गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तत्पर तपासचक्रे फिरवून दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व ७ आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
- रोहित उर्फ सोनु रमेश गोडबोले (वय २५ वर्षे, व्यवसाय: बेकार, रा. देगांवचाळ, नांदेड)
- जब्बा उर्फ आदित्य दयानंद हटकर (वय १९ वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. देगांवचाळ, नांदेड)
- रोहन माधव नवघडे (वय २३ वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. देगांवचाळ, नांदेड)
- अजय गौतम थोरात (वय २५ वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. देगांवचाळ, नांदेड)
- सुजल गणपत बहादुरे (वय १९ वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. देगांवचाळ, नांदेड)
- अभिजित भागेद्र नरवाडे (वय २६ वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. देगांवचाळ, नांदेड)
- कुणाल रमेश नवरे (वय १९ वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. देगांवचाळ, नांदेड)
न्यायालयीन कोठडी व तपास
अधिक तपाससाठी आरोपींना मा. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, मा. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (कोर्ट क्र. – ४, नांदेड) यांनी गुन्ह्याची तीव्रता पाहून सर्व आरोपींना दिनांक २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (PCR) मंजूर केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे, पो.स्टे. वजिराबाद, हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव, तसेच पोलीस उप अधीक्षक (नांदेड शहर) मा. रामेश्वर वैजंजे यांच्या मार्गदर्शनखाली पोनि/अजित कुंभार, सपोनि/प्रशांत लोंढे, पोउपनि/ सुनिल बुलंगे व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार शिवासाम्ब मठपती, विलास कदम, ज्वालासिंह बावरी, संतोष पोकळे, संतोष पावडे, भाऊसाहेब राठोड, इम्रान पाठण, किशोर जयस्वाल यांनी पार पाडली आहे.












