aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र विकास सेवा संघटना ४ व ५ डिसेंबरला सामूहिक रजेवर

Aawaz Times by Aawaz Times
December 3, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. ३ डिसेंबर  (प्रतिनिधी) माधव वाघमारे
आर्वी पंचायत समितीतील मनरेगा कामकाजासंदर्भातील प्रकरणात गटविकास अधिकारी सौ. सुनीता मरसकोल्हे यांना झालेल्या कथित नियमबाह्य अटकेविरोधात आंदोलनाची ठिणगी पडली असून, महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना–नांदेडने ४ व ५ डिसेंबर रोजी दोन दिवसांची सामूहिक रजा जाहीर केली आहे. या कालावधीत अधिकारी कोणतेही शासकीय कामकाज न करण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

संघटनेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, कोणतीही प्राथमिक चौकशी न करता, तसेच सौ. मरसकोल्हे या महिला अधिकारी असल्याने अनिवार्य प्रक्रिया न पाळता करण्यात आलेली कारवाई अन्यायकारक व मनमानी स्वरूपाची आहे. तांत्रिक प्रणालीतील त्रुटींना अधिकारी जबाबदार ठरवून गुन्हेगारासारखी वागणूक देणे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचेही संघटनेने नमूद केले.

याबाबत संघटनेने राज्य सरकारला कठोर इशारा दिला आहे. मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व रोहयो मंत्री यांच्या बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास राज्यभर कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हा मुद्दा राज्यातील ग्रामविकास विभागात गंभीर स्वरूप धारण करू शकतो.

जाहीर करण्यात आलेल्या निवेदनावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोळोदे, प्रकल्प अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांसह इतर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या आंदोलनामुळे मनरेगा तसेच विविध ग्रामीण विकास योजनांच्या शासकीय कामकाजावर आगामी दोन दिवस मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा आदेश

Next Post

आंचलचा धैर्यशाली लढा तीव्र VBA कडून कुटुंबीयांना पाठिंबा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

ग्रीन गोवा-क्लीन गोवा’ अभियानाचा शुभारंभ ९० दिवसांत लावली जाणार १० लाख झाडे
महाराष्ट्र

ग्रीन गोवा-क्लीन गोवा’ अभियानाचा शुभारंभ ९० दिवसांत लावली जाणार १० लाख झाडे

June 5, 2026
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी बल्लारशाह CSMT एक्सप्रेस महिनाभर दादर पर्यंतच धावणार
महाराष्ट्र

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी बल्लारशाह CSMT एक्सप्रेस महिनाभर दादर पर्यंतच धावणार

May 20, 2026
महाराष्ट्र

नांदेड विभागातील RPF ची कामगिरी ऑपरेशन नन्हे फरिश्ते

March 23, 2026
महाराष्ट्र

नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

March 12, 2026
महाराष्ट्र

शेख अफसर यांचा राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार २०२६ साठी निवड

March 10, 2026
महाराष्ट्र

तापी नदीवर रेल्वे अभियांत्रिकीचा मैलाचा दगड

February 17, 2026
Next Post

आंचलचा धैर्यशाली लढा तीव्र VBA कडून कुटुंबीयांना पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved