नांदेड १२ ऑगस्ट प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी, सराईत गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार मंगळवारी मध्यरात्री ११ ऑगस्ट रोजी रात्री २३:०० वा. ते १२ ऑगस्ट रोजी पहाटे ०३:०० वा. दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी विशेष “कॉम्बिंग ऑपरेशन” राबवण्यात आले.
या विशेष मोहिमेदरम्यान मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार, अवैध शस्त्र बाळगणारे, हद्दपार, तडीपार, हिस्ट्रीशीटर, पाहिजे/फरारी आरोपींची सखोल पडताळणी करण्यात आली. तसेच न्यायालयीन वॉरंट बजावणीसह अनेक संशयित व्यक्तींची झडती घेण्यात आली.
कारवाईचा संक्षिप्त तपशील:
- अधिकारी व अंमलदार: ५५ अधिकारी आणि २१८ पोलीस अंमलदार या मोहिमेत सहभागी झाले.
- तडीपार/प्रस्तावित गुन्हेगार तपासणी: कलम ५५, ५६, ५७ मधील ३० तडीपार गुन्हेगार तपासले गेले.
- इतर तपासणी: एमपीडीए (MPDA) मधून सुटलेले ३३ गुन्हेगार, तसेच मालमत्ता व शरीराविरुद्धचे ८८ सराईत गुन्हेगार तपासण्यात आले.
- वॉरंट व समन्स बजावणी: २९ जमानती (BW), ५ गैरजमानती (NBW) वॉरंट आणि ५५ समन्स बजावण्यात आले.
- गुन्हे दाखल: आर्म अॅक्टप्रमाणे ०४ गुन्हे तर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये ०२ गुन्हे दाखल करण्यात आले.
दाखल झालेले गुन्हे व आरोपी: १. स्थागुशा – वजिराबाद: गु.र.नं. ४००/२०२६ (कलम ४/२५ भा.ह.का.) – ०१ आरोपी २. भाग्यनगर: गु.र.नं. ४२८/२०२६ (कलम ४/२५ भा.ह.का.) – ०१ आरोपी ३. इतवारा: गु.र.नं. २७२/२०२६ (कलम ४/२५ भा.ह.का.) – ०१ आरोपी ४. विमानतळ: गु.र.नं. ३७४/२०२६ (कलम ४/२५ भा.ह.का.) – ०१ आरोपी ५. स्थागुशा – वजिराबाद: गु.र.नं. ३९९/२०२६ (कलम १२२ म.पो.का.) – ०१ आरोपी ६. भाग्यनगर: गु.र.नं. ४२७/२०२६ (कलम १२२ म.पो.का.) – ०२ आरोपी
सदर विशेष मोहीम मा. डॉ. नीलाभ रोहन (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (नांदेड व भोकर), सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि आरसीपी (RCP) पथकाने सक्रिय सहभाग घेऊन पार पाडली.
नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रभावी नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबवल्या जातील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
विशेष बातमी प्रतिनिधी: माधव वाघमारे












