aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Sunday, October 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Sunday, October 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले

Aawaz Times by Aawaz Times
August 12, 2026
in क्राईम
0
नांदेड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १२ ऑगस्ट प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी, सराईत गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार मंगळवारी मध्यरात्री ११ ऑगस्ट रोजी रात्री २३:०० वा. ते १२ ऑगस्ट रोजी पहाटे ०३:०० वा. दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी विशेष “कॉम्बिंग ऑपरेशन” राबवण्यात आले.

या विशेष मोहिमेदरम्यान मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार, अवैध शस्त्र बाळगणारे, हद्दपार, तडीपार, हिस्ट्रीशीटर, पाहिजे/फरारी आरोपींची सखोल पडताळणी करण्यात आली. तसेच न्यायालयीन वॉरंट बजावणीसह अनेक संशयित व्यक्तींची झडती घेण्यात आली.

कारवाईचा संक्षिप्त तपशील:

  • अधिकारी व अंमलदार: ५५ अधिकारी आणि २१८ पोलीस अंमलदार या मोहिमेत सहभागी झाले.
  • तडीपार/प्रस्तावित गुन्हेगार तपासणी: कलम ५५, ५६, ५७ मधील ३० तडीपार गुन्हेगार तपासले गेले.
  • इतर तपासणी: एमपीडीए (MPDA) मधून सुटलेले ३३ गुन्हेगार, तसेच मालमत्ता व शरीराविरुद्धचे ८८ सराईत गुन्हेगार तपासण्यात आले.
  • वॉरंट व समन्स बजावणी: २९ जमानती (BW), ५ गैरजमानती (NBW) वॉरंट आणि ५५ समन्स बजावण्यात आले.
  • गुन्हे दाखल: आर्म अ‍ॅक्टप्रमाणे ०४ गुन्हे तर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये ०२ गुन्हे दाखल करण्यात आले.

दाखल झालेले गुन्हे व आरोपी: १. स्थागुशा – वजिराबाद: गु.र.नं. ४००/२०२६ (कलम ४/२५ भा.ह.का.) – ०१ आरोपी २. भाग्यनगर: गु.र.नं. ४२८/२०२६ (कलम ४/२५ भा.ह.का.) – ०१ आरोपी ३. इतवारा: गु.र.नं. २७२/२०२६ (कलम ४/२५ भा.ह.का.) – ०१ आरोपी ४. विमानतळ: गु.र.नं. ३७४/२०२६ (कलम ४/२५ भा.ह.का.) – ०१ आरोपी ५. स्थागुशा – वजिराबाद: गु.र.नं. ३९९/२०२६ (कलम १२२ म.पो.का.) – ०१ आरोपी ६. भाग्यनगर: गु.र.नं. ४२७/२०२६ (कलम १२२ म.पो.का.) – ०२ आरोपी

सदर विशेष मोहीम मा. डॉ. नीलाभ रोहन (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (नांदेड व भोकर), सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि आरसीपी (RCP) पथकाने सक्रिय सहभाग घेऊन पार पाडली.

नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रभावी नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबवल्या जातील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

विशेष बातमी प्रतिनिधी: माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई १४ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि इनोव्हा कार जप्त चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

धनेगाव पेट्रोल पंप हत्या प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई आणखी एक फरार आरोपी गोवर्धन घाटातून जेरबंद

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

जय भवानी चौकात २ ३५,५०० रुपयांचा ४ किलो ७१० ग्रॅम गांजा जप्त दोन आरोपी ना रंगेहात अटक
क्राईम

जय भवानी चौकात २ ३५,५०० रुपयांचा ४ किलो ७१० ग्रॅम गांजा जप्त दोन आरोपी ना रंगेहात अटक

October 25, 2026
वजिराबाद मधील शेतकऱ्याच्या अपहरण व खून प्रकरणी फायनान्स कंपनीशी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल
क्राईम

वजिराबाद मधील शेतकऱ्याच्या अपहरण व खून प्रकरणी फायनान्स कंपनीशी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल

October 25, 2026
शिवाजीनगर भागात छापा टाकून १.८० लाखांचा गांजा जप्त दोघांना अटक
क्राईम

शिवाजीनगर भागात छापा टाकून १.८० लाखांचा गांजा जप्त दोघांना अटक

October 24, 2026
होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा
क्राईम

होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

October 23, 2026
नांदेड मध्ये अवैध देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुण अटकेत
क्राईम

नांदेड मध्ये अवैध देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुण अटकेत

October 21, 2026
अवैध रेती वाहतुकीवर नांदेड पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक ४५ लाख २५ हजार मुद्देमाल जप्त प्रतिनिधी  माधव वाघमारे
क्राईम

अवैध रेती वाहतुकीवर नांदेड पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक ४५ लाख २५ हजार मुद्देमाल जप्त प्रतिनिधी  माधव वाघमारे

October 20, 2026
Next Post
धनेगाव पेट्रोल पंप हत्या प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई आणखी एक फरार आरोपी गोवर्धन घाटातून जेरबंद

धनेगाव पेट्रोल पंप हत्या प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई आणखी एक फरार आरोपी गोवर्धन घाटातून जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

जय भवानी चौकात २ ३५,५०० रुपयांचा ४ किलो ७१० ग्रॅम गांजा जप्त दोन आरोपी ना रंगेहात अटक

जय भवानी चौकात २ ३५,५०० रुपयांचा ४ किलो ७१० ग्रॅम गांजा जप्त दोन आरोपी ना रंगेहात अटक

October 25, 2026
वजिराबाद मधील शेतकऱ्याच्या अपहरण व खून प्रकरणी फायनान्स कंपनीशी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल

वजिराबाद मधील शेतकऱ्याच्या अपहरण व खून प्रकरणी फायनान्स कंपनीशी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल

October 25, 2026
शिवाजीनगर भागात छापा टाकून १.८० लाखांचा गांजा जप्त दोघांना अटक

शिवाजीनगर भागात छापा टाकून १.८० लाखांचा गांजा जप्त दोघांना अटक

October 24, 2026
होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

October 23, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved