aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

धनेगाव पेट्रोल पंप हत्या प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई आणखी एक फरार आरोपी गोवर्धन घाटातून जेरबंद

Aawaz Times by Aawaz Times
August 12, 2026
in क्राईम
0
धनेगाव पेट्रोल पंप हत्या प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई आणखी एक फरार आरोपी गोवर्धन घाटातून जेरबंद
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड  १२ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी)

धनेगाव येथील पेट्रोल पंपावर जुन्या वादातून खंजीराने वार करून करण्यात आलेल्या बहुचर्चित हत्या प्रकरणातील आणखी एका फरार आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. अजय उर्फ अज्जू महेंद्र बिगानिया (वय ३२, रा. वाल्मिकी नगर, देगलूर नाका, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकी घटना काय? ८ ऑगस्ट रोजी फिर्यादी व मयत इंद्रजितसिंग पिता बलजितसिंग बावरी (वय २५, रा. संत गाडगेबाबा सोसायटी, जुना कौठा) हे धनेगाव येथील धनेगावकर पेट्रोल पंपावर मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी नितीन बिगानिया, दिलीप डाकोरे, किन्ना परदेशी व त्यांच्या इतर साथीदारांनी पूर्ववैमनस्यातून कट रचून त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात खंजीराने गंभीर वार करून इंद्रजितसिंग यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ९५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व भारतीय हत्यार कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोवर्धन घाट परिसरातून आरोपीला ठोकल्या बेड्या पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष अभियान सुरू आहे. ११ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेचे पोउपनि पयूड व त्यांचे पथक वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, सदर गुन्ह्यातील आरोपी अजय उर्फ अज्जू हा गोवर्धन घाट परिसरात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. पथकाने तत्काळ सापळा रचून संशयितरित्या वावरणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने धनेगाव पेट्रोल पंपावरील हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास पुढील कारवाईसाठी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

आत्तापर्यंत ६ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वीच ५ आरोपींना ताब्यात घेतले असून, अजय उर्फ अज्जूच्या अटकेनंतर या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या ६ झाली आहे. सर्व आरोपींची गुन्ह्यातील भूमिका, हल्ल्याचे नियोजन व वापरलेली शस्त्रे याबाबत पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत.

कामगिरी करणारे पथक ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अतुल भोसले, पोउपनि साईनाथ पयूड, तसेच पोलीस अंमलदार संदीप घोगरे, बालाजी कदम, इम्रान शेख, संतोष बेल्लुरोड, प्रमोद जोंधळे, रवी हराळे आणि अमोल घेवारे (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड) यांच्या पथकाने पार पाडली.

– प्रतिनिधी माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले

Next Post

महापौर सौ. कविता मुळे आणि मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक
क्राईम

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त
क्राईम

मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त

August 22, 2026
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत

August 21, 2026
Next Post
महापौर सौ. कविता मुळे आणि मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

महापौर सौ. कविता मुळे आणि मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved