aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा दणका

Aawaz Times by Aawaz Times
August 15, 2026
in क्राईम
0
नांदेड मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा दणका
0
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १५ ऑगस्ट (प्रतिनिधी माधव वाघमारे) जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांनी दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगोली गेट फाटक ग्राउंड परिसरात सापळा रचून कारवाई करत अवैध खंबीर साठा आणि मोटारसायकलसह ८९,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे थरारक कारवाई

दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हिंगोली गेट फाटक ग्राउंड येथे दोन इसम मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या थांबले असून त्यांच्याकडे खंजीर आहेत. मिळालेल्या माहितीची शहानिशा करून पोलिसांनी पंचांसमक्ष तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले.

आरोपींची नावे व झडती

पोलीस तपासात ताब्यात घेतलेल्या दोघांनी आपली नावे खालीलप्रमाणे सांगितली: १. आकाश शंकर पालिमकर (वय २४ वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. दीपकनगर, तरोडा बु., नांदेड) २. रोहित आनंदा सावते (वय २३ वर्षे, व्यवसाय: ऑटोचालक, रा. येळेगाव, ता. अर्धापूर, ह.मु. पीडब्ल्यूडी कॉलनीजवळ, आनंदनगर चौक, नांदेड)

या दोघांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला ०२ खंजीर आढळून आले. सदर खंजीर त्यांनी गुरुद्वारा जवळील एका दुकानातून खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले.

विक्रेत्याच्या दुकानावर छापा

आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुद्वारा गेट नं. ०१, वजिराबाद येथील दुकानाची पाहणी केली. दुकानदार गुरुमतीसिंग खेमसिंग बुंगई (वय ५८ वर्षे, रा. गुरुद्वारा गेट नं. ०१, वजिराबाद, नांदेड) याच्या दुकानाची झडती घेतली असता विक्रीच्या उद्देशाने ठेवलेले आणखी ०७ खंजीर हस्तगत करण्यात आले.

या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण ०९ खंजीर आणि गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल असा एकूण ८९,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तिन्ही आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन वजिराबाद येथे गु.र.नं. ४०६/२०२६, कलम ४/२५ भारतीय शस्त्र अधिनियम (Arms Act) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

कारवाई करणारे पथक

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि/नागनाथ तुकडे, पोलीस अमलबदार मोहन हाके, मिलिंद नरबाग, ब्रह्मानंद लामतुरे, आबाराव पिंगलवाड आणि लहु चाटे asi दारा राठोड यांनी पार पाडली.

पोलीस प्रशासनाचे आवाहन: नांदेड जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, वाळू उत्खनन/वाहतूक, अवैध दारू, जुगार, गुटखा, अमली पदार्थांची विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. नागरिकांच्या परिसरात असा कोणताही बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्यास त्याची माहिती तात्काळ नांदेड पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

मंगलसूत्र चोरणाऱ्या आरोपीला भाग्यनगर गुन्हे शोध पथकाकडून बेड्या १ लाख ६६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या कामेश्वर वाघमारेची शासकीय सेवेसाठी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे विनंती

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक
क्राईम

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त
क्राईम

मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त

August 22, 2026
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत

August 21, 2026
Next Post
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या कामेश्वर वाघमारेची शासकीय सेवेसाठी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे विनंती

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या कामेश्वर वाघमारेची शासकीय सेवेसाठी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे विनंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved