aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
August 22, 2026
in क्राईम
0
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २२ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी)

नांदेड शहरात अवैध अग्निशस्त्रांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नवाघाट परिसरामध्ये कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ३२ हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य पुरवठादार फरार आहे.

पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि महेश कोरे व त्यांचे पथक नांदेड शहरात गस्त घालत असताना, नवाघाट परिसरातील व्यायाम शाळेंजवळील रोडवर दोन इसम संशयास्पद रित्या फिरत असल्याची बातमी गुप्त बातमीदाराकडून मिळाली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मोहम्मद फयाज अब्दुल रौफ (वय २९ वर्षे, रा. अहमदनगर गोल्डन बेकरी, देगलूर नाका, नांदेड) आणि मोहम्मद समीर मोहम्मद ताहेर अंसारी (वय २६ वर्षे, रा. जी.एम. कॉलनी, दुल्हेशहा रहमान नगर, नांदेड) या दोघांना ताब्यात घेतले.

झाडाझडती दरम्यान मोहम्मद फयाज याच्या पॅन्टच्या खिशात लपवून ठेवलेले अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल आणि २ हजार रुपये किमतीचे मॅगझीनमधील जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. हे शस्त्र परवेज बेग हाजी बेग (रा. देगलूर नाका, नांदेड) याच्याकडून विकत घेतल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी पोलीस स्टेशन इतवारा येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून फरार आरोपी परवेज बेगचा शोध सुरू आहे.

सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोउनि महेश कोरे तसेच पोलीस अंमलदार श्रीराम दासरे, संघरत्न गायकवाड, माधव माने, मनोज राठोड, सुधाकर देवकते व महेश बडगु यांच्या पथकाने पार पाडली.

– बातमी प्रतिनिधी: माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक
क्राईम

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त
क्राईम

मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त

August 22, 2026
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत

August 21, 2026
नांदेड पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी कारवाई एकाच दिवसात ४९ गुन्हे दाखल
क्राईम

नांदेड पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी कारवाई एकाच दिवसात ४९ गुन्हे दाखल

August 21, 2026
Next Post
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved