aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Friday, October 23, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Friday, October 23, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेडमध्ये ३ लाख १० हजार चा ब्राऊन शुगरसह दोघे अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
October 18, 2026
in क्राईम
0
नांदेडमध्ये ३ लाख १० हजार चा ब्राऊन शुगरसह दोघे अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड  १८ ऑक्टोंबर( प्रतिनिधी – माधव वाघमारे

नांदेड शहरामध्ये बेकायदेशीररित्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून तब्बल ६२ ग्रॅम वजनाचा ‘ब्राऊन शुगर’ (चिटा) हा अंमली पदार्थ आणि ३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

नांदेड जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशावरून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/रवि वाहुळे यांना गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीनगर, विवेकनगर भागातील आशिश किराणा दुकानाजवळ सिमेंट रोडवर दोन इसम स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या ब्राऊन शुगर विक्रीच्या उद्देशाने थांबले आहेत.

कारवाई आणि मुद्देमाल जप्ती

माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या परवानगीने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वात धाड टाकण्याचे नियोजन करण्यात आले. शासकीय पंच, वैधमापन शास्त्र विभागाचे राजपत्रित अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमसह दुपारी आशिश किराणा दुकानाजवळ छापा टाकण्यात आला.

त्यावेळी संशयितरीत्या आढळलेल्या दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे:

  1. गुरबिरसिंग हरपालसिंग संधु (वय ५० वर्षे, रा. तरण तारण, राज्य पंजाब, ह.मु. श्रीनगर, नांदेड)
  2. जनार्दन गोविंदराव सोनटक्के (वय ३० वर्षे, रा. ब्राह्मणवाडा, ता. जि. नांदेड)

राजपत्रित अधिकारी व पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपींच्या पॅन्टच्या खिशातून ६२.०० ग्रॅम वजनाचा ‘ब्राऊन शुगर’ (अंदाजे किंमत ₹३,१०,०००/-) हस्तगत करण्यात आला. फॉरेन्सिक सायन्सच्या सहाय्यक रासायनिक विश्लेषकांनी सदर पदार्थ ‘ब्राऊन शुगर’ असल्याचे निश्चित केले.

पंजाब कनेक्शन समोर!

आरोपींकडे कसून चौकशी केली असता, हा अंमली पदार्थ त्यांनी निक्का व बंटी (दोघे रा. पंजाब) यांच्याकडून विकत आणल्याचे सांगितले. याप्रकरणी सपोनि/रवि वाहुळे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गुरनं. ६०४/२०२६, कलम ८(क), २१(ब), २९ एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस पथक

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/रवि वाहुळे, पोउपनि/बळीराम दासरे, पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, गुंडेराव करले, रितेश कुलथे, दिलीपकुमार चंचलवार, उमर शेख, सुनिल गडलेवार, मोतीराम पवार, सिद्धार्थ सोनसळे, नरेन्द्र राठोड, तसेच वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक ब्रह्मानंद सावते व फॉरेन्सिक टीमचे राजेश पांचाळ, वेदांत नगनुरवार यांनी पार पाडली.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड जिल्हा परिषदेतील १७ ग्रामीण गृहनिर्माण अभियंते तडकाफडकी कार्यमुक्त

Next Post

विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदान करताना ही काळजी घ्या

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा
क्राईम

होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

October 23, 2026
नांदेड मध्ये अवैध देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुण अटकेत
क्राईम

नांदेड मध्ये अवैध देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुण अटकेत

October 21, 2026
अवैध रेती वाहतुकीवर नांदेड पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक ४५ लाख २५ हजार मुद्देमाल जप्त प्रतिनिधी  माधव वाघमारे
क्राईम

अवैध रेती वाहतुकीवर नांदेड पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक ४५ लाख २५ हजार मुद्देमाल जप्त प्रतिनिधी  माधव वाघमारे

October 20, 2026
नांदेड ग्रामीण पोलिसांची धाड ६.४० लाखांचा मुद्देमाल जप्त ५ जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

नांदेड ग्रामीण पोलिसांची धाड ६.४० लाखांचा मुद्देमाल जप्त ५ जणांवर गुन्हा दाखल

October 20, 2026
अट्टल घरफोडी व चेन स्नॅचिंग करणारे २ सराईत गुन्हेगार जेरबंद ८.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

अट्टल घरफोडी व चेन स्नॅचिंग करणारे २ सराईत गुन्हेगार जेरबंद ८.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
वाहेगाव येथे गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपशावर धाड २ कोटी २९ लाख चे साहित्य जप्त
क्राईम

वाहेगाव येथे गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपशावर धाड २ कोटी २९ लाख चे साहित्य जप्त

October 17, 2026
Next Post
विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदान करताना ही काळजी घ्या

विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदान करताना ही काळजी घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

October 23, 2026
नांदेड मध्ये अवैध देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुण अटकेत

नांदेड मध्ये अवैध देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुण अटकेत

October 21, 2026
अवैध रेती वाहतुकीवर नांदेड पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक ४५ लाख २५ हजार मुद्देमाल जप्त प्रतिनिधी  माधव वाघमारे

अवैध रेती वाहतुकीवर नांदेड पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक ४५ लाख २५ हजार मुद्देमाल जप्त प्रतिनिधी  माधव वाघमारे

October 20, 2026
नांदेड ग्रामीण पोलिसांची धाड ६.४० लाखांचा मुद्देमाल जप्त ५ जणांवर गुन्हा दाखल

नांदेड ग्रामीण पोलिसांची धाड ६.४० लाखांचा मुद्देमाल जप्त ५ जणांवर गुन्हा दाखल

October 20, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved