नांदेड जिल्ह्यातील लैंडी-मन्या येथे रामदास पाटील सुमठाणकर यांच्या जनसेवा कार्यालयाचे भव्य उद्घाटन व शुभारंभ सोहळा सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० जी. पी. टावर तुकाराम नगरी ता. देगलूर येथे पार पडणार आहे. या सोहळ्याला जिल्ह्यातील मान्यवर संत, राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
या सोहळ्याला १०८ श्री श्री सोमलिंग शिवाचार्य महाराज (विच्चुकडेकर), १०८ श्री श्री शिवानंद शिवाचार्य महाराज (तमलुरकर), १०८ श्री श्री सिद्धदयानंद शिवाचार्य महाराज (बेटमंगावकर), १०८ श्री श्री मल्ललिंगेश्वर शिवाचार्य महाराज (खलनायकर) यांच्यासह विविध मठांचे महामंडलेश्वर संत उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन प्रसंगी खासदार, आमदार तसेच जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतील. यामध्ये माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. अशोक शंकरराव चव्हाण, खासदार मा. प्रा. प्रताप पाटील चिखलीकर, आमदार मा. अमर राजुरकर, आमदार मा. बालकृष्ण पाटील खलनायक, खासदार मा. भास्कर पाटील खलनायक, खासदार मा. रविंद्र बडगुजर चव्हाण, खासदार मा. शिवसिंह शेटकुरे, खासदार मा. विमल पाटील शिरपूरकर, आमदार मा. राजेश पवार, आमदार मा. लक्ष्मणराव सोपोटे यांसारख्या मान्यवरांचा विशेष सहभाग राहणार आहे.
प्रमुख उपस्थिती:
सोहळ्याला नांदेड, लोहा-कंधार, उमरी-भोकर, मुखेड-हदगाव आदी मतदारसंघातील अनेक मान्यवर आमदार, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभणार आहे.
हा जनसेवा कार्यालयाचा उपक्रम ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिला व गरजूंसाठी मदतीचे केंद्र ठरणार असून सामाजिक कार्याला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
👉 आपल्या सर्वांना या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे विनम्र आमंत्रण आहे.












