aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, September 23, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home राजकारण

निर्भीड पत्रकार मुक्ता कदम यांनी उघड केली नांदेडच्या विकासकामांची पोलखोल शहरातील वास्तव मांडत प्रशासनाला आरसा

Aawaz Times by Aawaz Times
January 16, 2026
in राजकारण
0
0
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


नांदेड : १६ जानेवारी (दिपक मठपती)
नांदेड शहरातील विकासकामांचे खरे चित्र समाजमाध्यमांच्या माध्यमातून निर्भीडपणे जनतेसमोर मांडणाऱ्या युवा पत्रकार मुक्ता कदम यांच्या कार्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘राजमुद्रा’ या व्यासपीठावर झालेल्या त्यांच्या सविस्तर मुलाखतीतून नांदेड शहरातील विविध मूलभूत प्रश्नांवर त्यांनी परखड आणि ठाम भूमिका मांडली आहे.

मुक्ता कदम या मूळच्या माहूर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. मात्र नांदेड हे आपले होम टाऊन असल्याने शहराच्या विकासाबाबतची वस्तुस्थिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या स्वतः शहरातील विविध भागात प्रत्यक्ष फिरून रस्ते, नाले, शाळा, सार्वजनिक स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेत असून, त्या संदर्भातील व्हिडिओ यूट्यूब व समाजमाध्यमांवर प्रसारित करत आहेत.

कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन किंवा विरोध न करता केवळ जनतेचे प्रश्न समोर आणणे, हाच आपला उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. शासन व प्रशासनाने या मुद्द्यांकडे गांभीर्याने पाहून सुधारणा कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुलाखतीदरम्यान त्यांनी मल्टीपर्पज शाळेतील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न, जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था तसेच शाळांच्या जागा बिल्डरकडे जाण्याबाबत निर्माण होत असलेल्या भीतीकडे लक्ष वेधले. नांदेड विमानतळाच्या विकासाबाबत बोलताना विमानतळ शहराबाहेर असणे गरजेचे असतानाही सध्याच्या रचनेमुळे नागपूर, भोकर व हिंगोलीकडे जाणाऱ्या नागरिकांचे अंतर तब्बल पाच किलोमीटरने वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

शहरातील अस्वच्छता, सांडपाणी व्यवस्थेचा अभाव, ड्रेनेज लाईन्सची अपूर्ण कामे, शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी, तसेच अनेक ठिकाणी रस्ते व नाल्यांची कामे एकाच वेळी सुरू असल्यामुळे नागरिकांना होत असलेला प्रचंड त्रास त्यांनी अधोरेखित केला. एक काम पूर्ण झाल्यानंतरच दुसरे काम सुरू करावे, अशी जनतेची भावना त्यांनी मांडली.

सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांदरम्यान दुभाजक काढल्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निर्भीड पत्रकारिता, प्रत्यक्ष निरीक्षण आणि वास्तव मांडण्याची पद्धत यामुळे मुक्ता कदम यांच्या कार्याला समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

नांदेडच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांची वस्तुस्थिती समोर आणत त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना आत्मपरीक्षण करण्याची संधी दिली असून, त्यांची ही भूमिका नागरिकांमध्ये कौतुकास्पद ठरत आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

हिंद-दी-चादर श्री गुरु तेगबहादूर साहिबजी ३५० वा शहीदी समागम

Next Post

अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांसाठी सुवर्णसंधीमिनी ट्रॅक्टर व उपसाधन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

राजकारण

पत्नीच्या सहीवर सत्ता आता नाही नगरसेवक पतींची ‘लुडबुड’ महागात थेट कारवाईचे आदेश

January 31, 2026
राजकारण

अजित पवार यांच्या विमानप्रवासाबाबत गंभीर प्रश्न LEARJET 45XR विमानावर आधीही अपघाताचे डाग

January 28, 2026
राजकारण

महत्त्वाच्या नेत्याच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवस कार्यालयीन कामकाज बंद

January 28, 2026
राजकारण

प्रभाग क्र. ८ शिवाजीनगरमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार डॉ. आंबेडकर नगरात सभेला मतदारांची मोठी गर्दी

January 8, 2026
राजकारण

प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मैदानात

January 7, 2026
राजकारण

नांदेड ग्रामीण चे  पो नि चिंचोलकर यांची दबंग कामगिरी

January 4, 2026
Next Post

अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांसाठी सुवर्णसंधीमिनी ट्रॅक्टर व उपसाधन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved