aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Sunday, October 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Sunday, October 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेड वाघळा शहर महानगरपालिकेत भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Aawaz Times by Aawaz Times
August 15, 2026
in आपलं नांदेड
0
नांदेड वाघळा शहर महानगरपालिकेत भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १५ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी – माधव वाघमारे) भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापन दिन आज, १५ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड वाघळा शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या मुख्य शासकीय सोहळ्यात महापौर सौ. कविता संतोष मुळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या प्रसंगी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी ठीक ८:०५ वाजता सोहळ्याची सुरुवात ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताने झाली. ध्वजारोहण झाल्यानंतर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत सादर केले. यानंतर पोलीस दल आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तिरंग्याला शिस्तबद्ध सलामी दिली.

नांदेडचा सर्वांगीण विकास हीच खरी देशसेवा : महापौर

ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना महापौर सौ. कविता मुळे यांनी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना आणि क्रांतीवीर वीरांना विनम्र अभिवादन केले. त्या पुढे म्हणाल्या,

“नांदेड शहराचा सर्वांगीण विकास करणे, शहर स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदूषणमुक्त ठेवणे हीच खऱ्या अर्थाने आपली राष्ट्रसेवा ठरेल. महापालिका प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रित येऊन शहराच्या प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे.”

पारदर्शक आणि गतिमान सेवेसाठी पालिका कटिबद्ध : मनपा आयुक्त

आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या संदेशात मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी पालिकेच्या आगामी उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले,

“स्वातंत्र्यदिनाच्या या अमृतोत्तर टप्प्यावर नांदेड पालिकेची संपूर्ण यंत्रणा नागरिकांना अधिक गतीने, तत्परतेने आणि पारदर्शकपणे सेवा देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. शहरातील प्रलंबित विकासकामांना गती देऊन प्रशासकीय कामकाज अधिक लोकभिमुख केले जाईल.”

पदाधिकारी व अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

या सोहळ्यास शहराचे उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेते महेश कनकदंडे, शिक्षण, महिला व बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, उपसभापती निरंजना लांडगे, गटनेते संदीपसिंग गाडीवाले, मसूद खान, प्रशांत इंगोले, साबेर चाऊस, माजी पदाधिकारी व विविध सन्माननीय नगरसेवक उपस्थित होते.

तसेच प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अभिजीत वायकोस, नितीन गाढवे, सहआयुक्त अजितपालसिंघ संधु, गंगाधर ईरलोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, शहर अभियंता सुमंत पाटील, नगररचनाकार ओम लहाने, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, दिलीप टाकलीकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिट्ठे, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादेक, क्रीडा अधिकारी रमेश चौरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रईसोद्दीन, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, मुख्य उद्यान अधिक्षक डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, शिक्षण अधिकारी प्रवीणा मांदळे, उपअभियंता प्रकाश कांबळे, सतीश ढवळे, खुशाल कदम, क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे, राजेश जाधव, गौतम कवडे, नागनाथ पतंगे, विठ्ठल तिडके, अग्निशमन अधिकारी के. जी. दासरे, मालमत्ता व्यवस्थापक पद्माकर कावळे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन मनपाच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने करण्यात आले.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

स्वातंत्र्यदिन व संस्थापक अध्यक्षांच्या पुण्यतिथीनिमित्त कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेत शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप

Next Post

नांदेड जिल्हा परिषदेत ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात नांदेड परिक्षेत्राचा डंका ७ रौप्य पदकांसह श्वानपथकाने पटकावले सांघिक विजेतेपद
आपलं नांदेड

२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात नांदेड परिक्षेत्राचा डंका ७ रौप्य पदकांसह श्वानपथकाने पटकावले सांघिक विजेतेपद

October 19, 2026
विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदान करताना ही काळजी घ्या
आपलं नांदेड

विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदान करताना ही काळजी घ्या

October 19, 2026
नांदेड जिल्हा परिषदेतील १७ ग्रामीण गृहनिर्माण अभियंते तडकाफडकी कार्यमुक्त
आपलं नांदेड

नांदेड जिल्हा परिषदेतील १७ ग्रामीण गृहनिर्माण अभियंते तडकाफडकी कार्यमुक्त

October 18, 2026
नांदेड महानगरपालिकेत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

नांदेड महानगरपालिकेत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

October 15, 2026
नांदेड जिल्ह्यात १७ व १८ ऑक्टोबरला वादळी पावसाचा येलो अलर्ट प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात १७ व १८ ऑक्टोबरला वादळी पावसाचा येलो अलर्ट प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

October 15, 2026
सौ. सुनंदाताई जोगदंड यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख
आपलं नांदेड

सौ. सुनंदाताई जोगदंड यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख

October 15, 2026
Next Post
नांदेड जिल्हा परिषदेत ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

नांदेड जिल्हा परिषदेत ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

जय भवानी चौकात २ ३५,५०० रुपयांचा ४ किलो ७१० ग्रॅम गांजा जप्त दोन आरोपी ना रंगेहात अटक

जय भवानी चौकात २ ३५,५०० रुपयांचा ४ किलो ७१० ग्रॅम गांजा जप्त दोन आरोपी ना रंगेहात अटक

October 25, 2026
वजिराबाद मधील शेतकऱ्याच्या अपहरण व खून प्रकरणी फायनान्स कंपनीशी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल

वजिराबाद मधील शेतकऱ्याच्या अपहरण व खून प्रकरणी फायनान्स कंपनीशी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल

October 25, 2026
शिवाजीनगर भागात छापा टाकून १.८० लाखांचा गांजा जप्त दोघांना अटक

शिवाजीनगर भागात छापा टाकून १.८० लाखांचा गांजा जप्त दोघांना अटक

October 24, 2026
होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

October 23, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved