aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Sunday, October 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Sunday, October 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

भूमि अभिलेख कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराविरोधात १४ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर टायगर ग्रुपचे बेमुदत आमरण उपोषण

Aawaz Times by Aawaz Times
August 13, 2026
in आपलं नांदेड
0
भूमि अभिलेख कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराविरोधात १४ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर टायगर ग्रुपचे बेमुदत आमरण उपोषण

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; motionR: 0; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 345.98456;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?Cloudy, icon:1, weatherInfo:100;temperature: 41;zeissColor: bright;

0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड (विशेष बातमी प्रतिनिधी : माधव वाघमारे) नांदेड येथील उप अधिकषक भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी संगणमत करून, आर्थिक देवाणघेवाण करत बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस फेरफार मंजूर केल्याचा गंभीर आरोप टायगर ग्रुपचे नांदेड जिल्हाध्यक्ष पैलवान बाळासाहेब दगडू जाधव यांनी केला आहे. या प्रकरणी वारंवार तक्रारी व पुरावे देऊनही प्रशासनाकडून योग्य कारवाई न झाल्यामुळे, येत्या १४ ऑगस्ट २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदानावर शेकडो कार्यकर्त्यांसह बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

पैलवान बाळासाहेब जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड उप अधिकषक भूमि अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक श्री. बळवंत विठ्ठलराव मस्के, श्री. रवि शेषराव श्रीरामे, श्री. दिनेश पुंडलीकराव कुडे, श्री. उत्तम रामजी मुरमुरे आणि श्री. शंकर गुंडोपंत सुर्यवंशी यांनी आपापसात संगणमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे न.भु.क्र. ६३६८ मधील फेरफार क्र. २९७५४ (दि. १८/०३/२०२५) व फेरफार क्र. ३००३० (दि. २७/०४/२०२५) मंजूर केले.

माहिती अधिकारांतर्गत (RTI) या दोन्ही फेरफारांची संचिका मागितली असता ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर प्रथम अपील दाखल केल्यानंतर कागदपत्रे प्राप्त झाली, ज्यातून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले.

एकतर्फी सुनावणी आणि ‘डिसमिस इन डिफॉल्ट’चा आरोप

या प्रकरणी जमाबंदी आयुक्त, पुणे व जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांच्याकडे तक्रार केल्यानंतर उपोषणाची नोटीस दिली असता, प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन देऊन उपोषण न करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

मात्र, दि. २७/०७/२०२६ रोजी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांच्या कार्यालयाकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात (जा.क्र. ३७५२/२०२६), तक्रारदारास अपिलाची कोणतीही पूर्वसूचना किंवा तारीख न देता हे प्रकरण ‘Dismiss in Default’ (गैरहजेरीमुळे एकतर्फी निकाली) काढल्याचे कळवण्यात आले. याशिवाय, सर्वात मोठ्या गैरव्यवहाराचा भाग असलेल्या फेरफार क्र. ३००३० चा उल्लेखच अपिलात मुद्दाम टाळण्यात आल्याचा आरोप बाळासाहेब जाधव यांनी केला आहे.

मुख्य मागण्या:

  • संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करावी.
  • बोगस फेरफार व भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करण्यात यावेत.
  • बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेले फेरफार रद्द करून मूळ नोंदी पूर्ववत कराव्यात.

प्रशासनाला स्मरणपत्र आणि उपोषणाचा इशारा

टायगर ग्रुपतर्फे मा. लोकायुक्त, मुख्य सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), जमाबंदी आयुक्त पुणे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी नांदेड यांना स्मरणपत्र (क्र. ०१) पाठवून आंदोलनाची पूर्वसूचना देण्यात आली आहे.

“सरकारी महसुलात होणारा भ्रष्टाचार उघड करणे आणि जनतेला न्याय मिळवून देणे हा आमचा हेतू आहे. प्रशासनाने अपिलाची संधी न देता प्रकरण एकतर्फी निकाली काढून भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून आझाद मैदान, मुंबई येथे आम्ही बेमुदत आमरण उपोषणाला बसत आहोत. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा कार्यकर्त्यांच्या जिवितास धोका निर्माण झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची असेल.  पैलवान बाळासाहेब दगडू जाधव (जिल्हाध्यक्ष, टायगर ग्रुप नांदेड)

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड दौऱ्यावर आलेल्या पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर खंजीरने हल्ला बचावासाठी धावलेले पोलीस निरीक्षकही जखमी

Next Post

अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या नांदेड दौऱ्याची जोरदार तयारी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात नांदेड परिक्षेत्राचा डंका ७ रौप्य पदकांसह श्वानपथकाने पटकावले सांघिक विजेतेपद
आपलं नांदेड

२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात नांदेड परिक्षेत्राचा डंका ७ रौप्य पदकांसह श्वानपथकाने पटकावले सांघिक विजेतेपद

October 19, 2026
विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदान करताना ही काळजी घ्या
आपलं नांदेड

विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदान करताना ही काळजी घ्या

October 19, 2026
नांदेड जिल्हा परिषदेतील १७ ग्रामीण गृहनिर्माण अभियंते तडकाफडकी कार्यमुक्त
आपलं नांदेड

नांदेड जिल्हा परिषदेतील १७ ग्रामीण गृहनिर्माण अभियंते तडकाफडकी कार्यमुक्त

October 18, 2026
नांदेड महानगरपालिकेत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
आपलं नांदेड

नांदेड महानगरपालिकेत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

October 15, 2026
नांदेड जिल्ह्यात १७ व १८ ऑक्टोबरला वादळी पावसाचा येलो अलर्ट प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात १७ व १८ ऑक्टोबरला वादळी पावसाचा येलो अलर्ट प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

October 15, 2026
सौ. सुनंदाताई जोगदंड यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख
आपलं नांदेड

सौ. सुनंदाताई जोगदंड यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख

October 15, 2026
Next Post
अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या नांदेड दौऱ्याची जोरदार तयारी

अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या नांदेड दौऱ्याची जोरदार तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

जय भवानी चौकात २ ३५,५०० रुपयांचा ४ किलो ७१० ग्रॅम गांजा जप्त दोन आरोपी ना रंगेहात अटक

जय भवानी चौकात २ ३५,५०० रुपयांचा ४ किलो ७१० ग्रॅम गांजा जप्त दोन आरोपी ना रंगेहात अटक

October 25, 2026
वजिराबाद मधील शेतकऱ्याच्या अपहरण व खून प्रकरणी फायनान्स कंपनीशी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल

वजिराबाद मधील शेतकऱ्याच्या अपहरण व खून प्रकरणी फायनान्स कंपनीशी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल

October 25, 2026
शिवाजीनगर भागात छापा टाकून १.८० लाखांचा गांजा जप्त दोघांना अटक

शिवाजीनगर भागात छापा टाकून १.८० लाखांचा गांजा जप्त दोघांना अटक

October 24, 2026
होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

October 23, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved