नांदेड, दि. 10 ऑक्टोबर : नांदेड जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमधील सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पार पडली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पार पडली. या सोडतीच्या प्रक्रियेला जिल्हा परिषद अधिकारी, विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी, जनप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या सोडतीत पंचायत समिती निहाय सभापती पदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे –
- भोकर: अनुसूचित जाती (महिला)
- हिमायतनगर: अनुसूचित जाती
- किनवट: अनुसूचित जाती
- उमरी: अनुसूचित जमाती
- मुदखेड: अनुसूचित जमाती (महिला)
- नांदेड: नागरिकांचा मागास प्रवर्ग
- हदगाव: नागरिकांचा मागास प्रवर्ग
- नायगाव (खै.): नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- लोहा: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- देगलूर: सर्वसाधारण (महिला)
- मुखेड: सर्वसाधारण (महिला)
- बिलोली: सर्वसाधारण (महिला)
- धर्माबाद: सर्वसाधारण (महिला)
- कंधार: सर्वसाधारण
- अर्धापूर: सर्वसाधारण
- माहूर: सर्वसाधारण
या सोडतीनंतर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांची आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आगामी निवडणुकांमध्ये याच आरक्षणानुसार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तसेच अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीय घटकांना प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पार पडली












