aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home Uncategorized

मध्यप्रदेशातून चोरी करणारी आंतरराज्य टोळी नांदेड पोलिसांच्या जाळ्यात

Aawaz Times by Aawaz Times
December 14, 2025
in Uncategorized
0
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड | दि. १४ डिसेंबर २०२५ (प्रतिनिधी) माधव वाघमारे

नांदेड जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई करत मध्यप्रदेशातून चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा

नांदेड यांच्या पथकाने ही कारवाई करून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण ७ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून ४ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव, भाग्यनगर, वजीराबाद, भोकर, किनवट व लोहा या पोलीस ठाण्यांतील भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेला रोख व इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे.

नांदेड जिल्ह्यात चोरी करणारी टोळी मध्यप्रदेशातील असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर, वरिष्ठांच्या आदेशानुसार दोन विशेष पथके तयार करण्यात आली. यापैकी एक पथक मध्यप्रदेशात सुमारे दहा दिवस तळ ठोकून तपास करत होते, तर दुसरे पथक नांदेड शहर व परिसरात संशयितांचा शोध घेत होते.

दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी रेल्वे स्टेशन नांदेड परिसरात सापळा रचून पोलिसांनी संशयित आरोपी अनिकेश गजेंद्र सिरसटिया (वय २०, व्यवसाय – बेकार, रा. मावखेडी, ता. मांगली, जि. अशोकनगर, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत एक विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींच्या अंगझडती व तपासात त्यांच्या ताब्यातून ४,०१,००० रुपये रोख मिळून आले.

चौकशीत आरोपींनी नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. हे आरोपी बँकेत पैसे काढणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवून तसेच लग्नसमारंभ व गर्दीच्या ठिकाणी संधी साधून चोरी करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. विधिसंघर्षग्रस्त बालकासह आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी अर्धापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, भोकर व मा. श्री. सूरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय तसेच त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

नांदेड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे आंतरराज्य चोरी टोळीला मोठा दणका बसला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर नांदेड पोलिसांचा कडक दणका

Next Post

श्री शरदचंद्र पवार विधि महाविद्यालयात परीक्षा शांततेत व सुरळीत पार

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

रामतीर्थ पोलिसांची मोठी कारवाई अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला ४० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त
Uncategorized

रामतीर्थ पोलिसांची मोठी कारवाई अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला ४० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

July 21, 2026
नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई गावठी पिस्तलसह एका आरोपीला ठोकल्या बेड्या
Uncategorized

नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई गावठी पिस्तलसह एका आरोपीला ठोकल्या बेड्या

July 12, 2026
अबिनाश कुमार सरांच्या बदलीनंतर नांदेडच्या रात्री बदलल्या साडेदहानंतरची ती कडक शिस्त गायब ११ वाजले तरी रस्त्यांवर शुकशुकाट
Uncategorized

अबिनाश कुमार सरांच्या बदलीनंतर नांदेडच्या रात्री बदलल्या साडेदहानंतरची ती कडक शिस्त गायब ११ वाजले तरी रस्त्यांवर शुकशुकाट

June 27, 2026
जमिनीची मोजणी एनए आणि तांत्रिक कामांना मिळणार वेग जिल्ह्यात तीन नवीन भूमी अभिलेख कार्यालये सुरू
Uncategorized

जमिनीची मोजणी एनए आणि तांत्रिक कामांना मिळणार वेग जिल्ह्यात तीन नवीन भूमी अभिलेख कार्यालये सुरू

June 16, 2026
भिवंडी पालिकेचे सहाय्यक आयुक्त क्रेटा गाडीत अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात
Uncategorized

भिवंडी पालिकेचे सहाय्यक आयुक्त क्रेटा गाडीत अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

June 14, 2026
नांदेड पोलिसांचे अवैध धंद्यांवर ऑपरेशन क्रॅकडाऊन मास रेडमध्ये ७ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त
Uncategorized

नांदेड पोलिसांचे अवैध धंद्यांवर ऑपरेशन क्रॅकडाऊन मास रेडमध्ये ७ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 12, 2026
Next Post

श्री शरदचंद्र पवार विधि महाविद्यालयात परीक्षा शांततेत व सुरळीत पार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved