aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर नांदेड पोलिसांचा कडक दणका

Aawaz Times by Aawaz Times
December 14, 2025
in क्राईम
0
0
SHARES
48
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड 14 डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांततेचा भंग करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा नांदेड पोलिसांनी दिला आहे. मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशानुसार नांदेड शहरात ‘सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह’ अंतर्गत विशेष पथके कार्यरत असून, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथक प्रमुख सपोनि श्री. भागवत नागरगोजे व विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी-अंमलदारांनी दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी नांदेड शहरातील विविध भागांत पेट्रोलिंगदरम्यान ही कारवाई केली.

पोलीस ठाणेनिहाय कारवाईचा तपशील

  1. विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत – रामनगर, हातोडा चौक परिसरात 08 इसम मद्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळून आले. त्यांच्यावर कलम 110/117 म.पो.का. अंतर्गत कारवाई करण्यात आली. वाहतूक अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कलम 285 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दोन वाहनांवर 1,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच दारूची दुकाने, वाईन शॉप व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
  2. नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत – एम.आय.डी.सी., दूध डेअरी, दाबके कॉर्नर परिसरात 05 इसम मद्यप्राशन करताना मिळून आले. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली व संबंधित आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
  3. वजिराबाद पोलीस ठाणे हद्दीत – बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात 02 इसमांवर मद्यप्राशन प्रकरणी कारवाई करण्यात आली.
  4. शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत – गोकुळनगर परिसरात 01 इसम सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना आढळून आला. त्याच्यावर कलम 110/117 म.पो.का. अंतर्गत कारवाई करण्यात आली.
  5. दामिनी पथकाची कारवाई – आर.आर.सी. कोचिंग क्लासेस परिसरात 02 इसम मद्यप्राशन करून गोंधळ घालताना आढळून आले. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईदरम्यान शहरातील दारूची दुकाने, वाईन शॉप्स व हॉटेल्सचीही तपासणी करण्यात आली. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे अथवा दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे हे गुन्हा असून, अशा प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

नांदेड शहरातील नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड जिल्ह्यात बिबट्याची दहशत 25 बिबटे आढळल्याची माहिती, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

मध्यप्रदेशातून चोरी करणारी आंतरराज्य टोळी नांदेड पोलिसांच्या जाळ्यात

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

नांदेड मध्ये अवैध वाळू वाहतुकीवर भाग्यानगर पोलिसांची धडक कारवाई

August 3, 2026
Next Post

मध्यप्रदेशातून चोरी करणारी आंतरराज्य टोळी नांदेड पोलिसांच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved