aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड पोलिसांची धडक कारवाई ९ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा ६ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
August 20, 2026
in क्राईम
0
नांदेड पोलिसांची धडक कारवाई ९ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा ६ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड  २० ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी)

नांदेड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या चेन स्नॅचिंग (गळ्यातील दागिने लांबवणे) व जबरी चोरी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB), इतवारा, शिवाजीनगर व विमानतळ पोलीस ठाण्याच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत ९ गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा केला आहे. या कारवाईत आरोपींकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकली असा एकूण ६,७४,०७५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांची विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडक कारवाई:

१) इतवारा व भाग्यानगर हद्दीतील चेन स्नॅचिंग:

  • योगेश नरसिंग दारेवाड (वय १८, रा. संतवाडी, ब्रम्हपूरी, चौफाळा, नांदेड) आणि एका विधि संघर्षग्रस्त बालकास गुन्हे शोध पथकाने सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे ताब्यात घेतले. त्यांच्याकडून इतवारा, भाग्यानगर ठाण्यांमधील ५ गुन्ह्यांतील ४,६४,९७५/- रुपयांचे सोन्याचे मनी-मंगळसूत्र, ४ स्मार्टफोन आणि स्प्लेंडर मोटरसायकल जप्त करण्यात आली.

२) नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील कारवाई:

  • वाघाळा परिसरात घडलेल्या स्नॅचिंग प्रकरणी आरोपी अरबाजखान खान उर्फ अब्बु आरेफखान पठाण (वय ३०, रा. फारुकनगर, नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३०,०००/- रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले.

३) शिवाजीनगर व विमानतळ ठाण्याच्या हद्दीतील दरोडा/चोरीचा उलगडा:

  • अण्णाभाऊ साठे चौक व नांदेड बायपास परिसरात खंजीर दाखवून लुटमारी करणाऱ्या आरोपी गणेश राजाराम हिवराळे (वय २८, रा. नुरी चौक, नांदेड) आणि शिवाजी पुंडलिक डुबुकवाड (वय २५, रा. नुरी चौक, नांदेड) यांना शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम व स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण ६४,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

४) विधि संघर्षग्रस्त बालकाकडून पूर्ण मुद्देमाल हस्तगत:

  • शिवाजीनगर हद्दीत दत्तनगर रेल्वे पटरी जवळ घडलेल्या स्नॅचिंग गुन्ह्यात एका विधि संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ६०,०००/- रुपये किमतीची १.५ तोळे सोन्याची साखळी (१००% मुद्देमाल) जप्त करण्यात आली.

या पथकाने बजावली धडक कामगिरी:

पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/अतुल भोसले, पोउपनि/साईनाथ पुयड, पोनि/रामेश्वर खनाळ, पोनि/संजय शिंदे, पोनि/राजेश पुरी, पोउपनि/प्रविण आगलावे, पोउपनि/सच्चिद व पोलीस अंमलदार संतोष बेल्लुरोड, इम्रान शेख, बालाजी कदम, प्रमोद जोंधळे, संदीप घोगरे, रविकुमार हराळे, अमोल घेवारे, महेश बडगु, मिर्झा अख्तर बेग, बंडु कलंदर, सदाशिव कदम, शेख इसराईल, रेवणनाथ कोरनुळे, हरप्रितसिंग सुखई, मारोती गित्ते, साहेबराव जगताप, आकोसकर, कांबळे, कालो, काकडे, यादगीरवाड, यमलवाड आणि सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, रेश्मा पठाण यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

नांदेड पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

प्रतिनिधी माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड मध्ये खाजगी घरात चालणाऱ्या कूटणखान्यावर पोलिसांचा छापा

Next Post

सोनखेड पोलिसांची धडक कारवाई म्हैस चोरीचा गुन्हा उघडकीस ७० हजार रुपयांची म्हैस जप्त करून आरोपींना ठोकल्या ठोकल्या मुसक्या

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक
क्राईम

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त
क्राईम

मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त

August 22, 2026
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत

August 21, 2026
Next Post
सोनखेड पोलिसांची धडक कारवाई म्हैस चोरीचा गुन्हा उघडकीस ७० हजार रुपयांची म्हैस जप्त करून आरोपींना ठोकल्या ठोकल्या मुसक्या

सोनखेड पोलिसांची धडक कारवाई म्हैस चोरीचा गुन्हा उघडकीस ७० हजार रुपयांची म्हैस जप्त करून आरोपींना ठोकल्या ठोकल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved