नांदेड २० ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी)
नांदेड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या चेन स्नॅचिंग (गळ्यातील दागिने लांबवणे) व जबरी चोरी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB), इतवारा, शिवाजीनगर व विमानतळ पोलीस ठाण्याच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत ९ गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा केला आहे. या कारवाईत आरोपींकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकली असा एकूण ६,७४,०७५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांची विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडक कारवाई:
१) इतवारा व भाग्यानगर हद्दीतील चेन स्नॅचिंग:
- योगेश नरसिंग दारेवाड (वय १८, रा. संतवाडी, ब्रम्हपूरी, चौफाळा, नांदेड) आणि एका विधि संघर्षग्रस्त बालकास गुन्हे शोध पथकाने सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे ताब्यात घेतले. त्यांच्याकडून इतवारा, भाग्यानगर ठाण्यांमधील ५ गुन्ह्यांतील ४,६४,९७५/- रुपयांचे सोन्याचे मनी-मंगळसूत्र, ४ स्मार्टफोन आणि स्प्लेंडर मोटरसायकल जप्त करण्यात आली.
२) नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील कारवाई:
- वाघाळा परिसरात घडलेल्या स्नॅचिंग प्रकरणी आरोपी अरबाजखान खान उर्फ अब्बु आरेफखान पठाण (वय ३०, रा. फारुकनगर, नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३०,०००/- रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले.
३) शिवाजीनगर व विमानतळ ठाण्याच्या हद्दीतील दरोडा/चोरीचा उलगडा:
- अण्णाभाऊ साठे चौक व नांदेड बायपास परिसरात खंजीर दाखवून लुटमारी करणाऱ्या आरोपी गणेश राजाराम हिवराळे (वय २८, रा. नुरी चौक, नांदेड) आणि शिवाजी पुंडलिक डुबुकवाड (वय २५, रा. नुरी चौक, नांदेड) यांना शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम व स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण ६४,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
४) विधि संघर्षग्रस्त बालकाकडून पूर्ण मुद्देमाल हस्तगत:
- शिवाजीनगर हद्दीत दत्तनगर रेल्वे पटरी जवळ घडलेल्या स्नॅचिंग गुन्ह्यात एका विधि संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ६०,०००/- रुपये किमतीची १.५ तोळे सोन्याची साखळी (१००% मुद्देमाल) जप्त करण्यात आली.
या पथकाने बजावली धडक कामगिरी:
पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/अतुल भोसले, पोउपनि/साईनाथ पुयड, पोनि/रामेश्वर खनाळ, पोनि/संजय शिंदे, पोनि/राजेश पुरी, पोउपनि/प्रविण आगलावे, पोउपनि/सच्चिद व पोलीस अंमलदार संतोष बेल्लुरोड, इम्रान शेख, बालाजी कदम, प्रमोद जोंधळे, संदीप घोगरे, रविकुमार हराळे, अमोल घेवारे, महेश बडगु, मिर्झा अख्तर बेग, बंडु कलंदर, सदाशिव कदम, शेख इसराईल, रेवणनाथ कोरनुळे, हरप्रितसिंग सुखई, मारोती गित्ते, साहेबराव जगताप, आकोसकर, कांबळे, कालो, काकडे, यादगीरवाड, यमलवाड आणि सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, रेश्मा पठाण यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
नांदेड पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
प्रतिनिधी माधव वाघमारे












