aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
August 25, 2026
in क्राईम
0
नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

२५ ऑगस्ट प्रतिनिधी: माधव वाघमारे

नांदेड शहर व परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरी आणि घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली असून एका सराईत आरोपीला रंगेहात पकडण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत.

मामा चौक परिसरात सापळा अन् थरारक पाठलाग पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली जात आहे. दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्या पथकाला कौठा परिसरातील मामा चौक येथे एक व्यक्ती चोरीचे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी दुचाकीवर येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मामा चौक परिसरात सापळा रचला. दुपारच्या सुमारास संशयित व्यक्ती तिथे आली, मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्याने दुचाकी तिथेच टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिताफीने पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. मोहम्मद आफताब उर्फ अद्यु पि. अब्दुल खदीर (वय २२ वर्षे, रा. मोमीनपुरा हतई, इतवारा, नांदेड) असे या आरोपीचे नाव आहे.

उघडकीस आलेले गुन्हे आणि जप्त मुद्देमाल

  • भाग्यनगर पोलीस ठाणे (गु.र.नं. १०७/२०२६): आरोपी मोहम्मद आफताबने त्याचा साथीदार लखन उर्फ आकाश उर्फ लक्ष्मण देवकर (रा. भोकर, जि. नांदेड) याच्या मदतीने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास जय भवानी नगर भागात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने हिसकावून नेली होती. त्याच्याकडून ९ ग्रॅम वजनाची आणि अंदाजे १ लाख ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन तसेच गुन्ह्यात वापरलेली ४० हजार रुपयांची दुचाकी (MH-26-CJ-4129) जप्त करण्यात आली आहे.
  • अर्धापूर पोलीस ठाणे (गु.र.नं. १५५/२०२६): याव्यतिरिक्त, आरोपीने आपले इतर साथीदार अब्दुल उस्मान अब्दुल समी आणि शेख मोबीन शेख गौस यांच्या मदतीने अर्धापूर येथील दुर्गानगर भागातील एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरफोडी केल्याची कबुली प्राथमिक चौकशीत दिली आहे.

आरोपीकडून एकूण १,७५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भाग्यनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तसेच त्याच्या फरार साथीदारांचा पथकाद्वारे शोध सुरू आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील, आणि अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वात पो.उप.नि. मिलिंद सोनकांबळे, रवि बामने, चंद्रकांत स्वामी, अझहर शेख आणि अनिल बिरादार यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक
क्राईम

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त
क्राईम

मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त

August 22, 2026
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत

August 21, 2026
नांदेड पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी कारवाई एकाच दिवसात ४९ गुन्हे दाखल
क्राईम

नांदेड पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी कारवाई एकाच दिवसात ४९ गुन्हे दाखल

August 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved