अर्धापूर नांदेड (प्रतिनिधी – माधव वाघमारे) | १५ ऑक्टोबर २०२६ संसर्गजन्य आजार आणि विविध आजारपण दूर ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात साबणाने स्वच्छ हात धुणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन अर्धापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यू.डी. तोटावार यांनी केले. जागतिक हात धुवा दिनानिमित्त अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित विशेष जनजागृती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
विद्यार्थ्यांना गोष्टींमधून पटवून दिले स्वच्छतेचे महत्त्व जागतिक हात धुवा दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने झाली. गटविकास अधिकारी यू.डी. तोटावार यांनी रंजक गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्याचे आणि स्वच्छतेचे महत्त्व सोप्या भाषेत पटवून दिले. यानंतर स्वच्छ भारत मिशनच्या माहिती, शिक्षण व संवाद (IEC) पथकाच्या वतीने विद्यार्थ्यांना साबणाने हात धुण्याचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी हात धुण्याच्या विविध महत्त्वाच्या टप्प्यांची शास्त्रशुद्ध माहिती देऊन स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन विद्यार्थ्याना करण्यात आले.
दूग्ध उत्पादक बचत गट आणि अंगणवाडीला भेट शाळेतील कार्यक्रम संपल्यानंतर गटविकास अधिकारी यू.डी. तोटावार यांनी खैरगाव येथील ‘धारा दुग्ध उत्पादक सहायता गटाला’ प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी महिला बचत गटामार्फत सुरू करण्यात आलेल्या पाणी फिल्टर युनिट, हळद-मिरची कांडप यंत्र तसेच शेवया तयार करण्याच्या मशीनच्या कामाची पाहणी केली. या उपक्रमाबद्दल महिला सदस्यांचे कौतुक करत त्यांनी महिलांशी संवाद साधला. तसेच, गावातील अंगणवाडीला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली आणि संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
चौकट: आमदाबाद तांडा येथेही राबविला उपक्रम जागतिक हात धुवा दिनाचे औचित्य साधून अर्धापूर तालुक्यातील आमदाबाद तांडा येथेही विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथेही विद्यार्थ्यांना साबणाने हात धुण्याचे योग्य मार्ग व टप्पे प्रत्यक्ष करून दाखवण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती या दोन्ही कार्यक्रमांच्या प्रसंगी विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने स्वच्छ भारत मिशनचे माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ मिलिंद व्यवहारे, विस्तार अधिकारी एस.पी. गोखले, पी.एन. गर्जे, बालाजी गव्हाणे, दत्ता नांद्रे, संजय गोवंडे, प्रकाश इंगोले, माणिकराव सोळंके, धोंडीबा कल्याणकर, ग्रामपंचायत अधिकारी सदानंद मुधोळकर, मुख्याध्यापक शेख खमरोद्दीन, गजानन कल्याणकर, निळकंठ भोसले, कामाजी एडके, आणि धाराजी कदम उपस्थित होते.
तर आमदाबाद तांडा येथील कार्यक्रमात बायजाबाई देवराव पवार, इंदुबाई मधुकर पवार, काशाबाई दुर्गम, शिक्षिका भारतीबाई चंदर राठोड, अंगणवाडी कार्यकर्ती प्रतिभा लक्ष्मीकांत पांचाळ, पोलीस पाटील सुमनबाई शेषेराव चव्हाण, प्रियंका उदय चव्हाण, ज्योतीबाई कृष्णा राठोड, रंगराव सिताराम पवार, परसराम भजनु आडे, अशोक भिकु पवार आणि बालाजी गोविंद राठोड आदी ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.












