aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, October 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, October 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारा पिकअप जप्त

Aawaz Times by Aawaz Times
October 16, 2026
in क्राईम
0
गोवंशाची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणारा पिकअप जप्त
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १६ ऑक्टोंबर( प्रतिनिधी – माधव वाघमारे)

नांदेड जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत नायगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने कत्तलीसाठी अत्यंत निर्दयतेने गोवंशाची अवैध वाहतूक करणारा महिंद्रा बोलेरो पिकअप पकडून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ५ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून वाहनासह सुमारे ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी काय आहे घटना?

नायगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना १५ ऑक्टोबर २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, एका महिंद्रा बोलेरो पिकअपमधून कत्तलीसाठी गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवून मौजे होटाळा, नरसी ते मुखेड जाणारे रोडवर सापळा रचला.

दरम्यान, संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप (क्रमांक: MH-26-AD-8227) अडवून पंचासमक्ष तपासणी केली असता, वाहनामध्ये अत्यंत दाटीवाटीने व निर्दयतेने दोरीने बांधून वाहतूक केली जात असलेली ५ गोवंश जनावरे आढळून आली.

५.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस पथकाने पंचासमक्ष कारवाई करत खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

  1. महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-26-AD-8227) अंदाजे किंमत रु. ४,००,०००/-
  2. ०५ गोवंश जातीची जनावरे – अंदाजे किंमत रु. १,१२,०००/-
  • एकूण जप्त मुद्देमाल: रु. ५,१२,०००/-

दोघांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:

  1. सय्यद अलीम चाँदसाब (चालक, वय ५० वर्षे, रा. बेटमोगरा ता. मुखेड)
  2. मोहीद्दीन अब्दुलसाब कुरेशी (वय ४९ वर्षे, रा. बेटमोगरा, ता. मुखेड)

या दोघांविरुद्ध पोलीस ठाणे नायगाव येथे गुन्हा रजि. नंबर १३७/२०२६, ‘प्राण्यांना क्रूरतेने वागवणूक प्रतिबंध कायदा’ कलम ११(१)(ड),(ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

सदर यशस्वी कारवाई नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी (बिलोली उपविभाग) मा. श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव पोलीस ठाण्याचे पोनि. महेश माळी, पोलीस अंमलदार माधव पवार, विनोद भंडारे व होमगार्ड यांनी पार पाडली.

पोलीस प्रशासनाचे आवाहन: गोवंशाची अवैध वाहतूक, प्राण्यांवर क्रूरता किंवा कत्तलीसाठी संशयास्पद पद्धतीने जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा ‘डायल ११२’ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी

– प्रतिनिधी: माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

चोरीचा बनाव स्वतःचा ट्रक विकून तक्रार नोंदवणाऱ्या मूळ मालकासह ३ जण ताब्यात

Next Post

वाहेगाव येथे गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपशावर धाड २ कोटी २९ लाख चे साहित्य जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा
क्राईम

होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

October 23, 2026
नांदेड मध्ये अवैध देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुण अटकेत
क्राईम

नांदेड मध्ये अवैध देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुण अटकेत

October 21, 2026
अवैध रेती वाहतुकीवर नांदेड पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक ४५ लाख २५ हजार मुद्देमाल जप्त प्रतिनिधी  माधव वाघमारे
क्राईम

अवैध रेती वाहतुकीवर नांदेड पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक ४५ लाख २५ हजार मुद्देमाल जप्त प्रतिनिधी  माधव वाघमारे

October 20, 2026
नांदेड ग्रामीण पोलिसांची धाड ६.४० लाखांचा मुद्देमाल जप्त ५ जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

नांदेड ग्रामीण पोलिसांची धाड ६.४० लाखांचा मुद्देमाल जप्त ५ जणांवर गुन्हा दाखल

October 20, 2026
नांदेडमध्ये ३ लाख १० हजार चा ब्राऊन शुगरसह दोघे अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
क्राईम

नांदेडमध्ये ३ लाख १० हजार चा ब्राऊन शुगरसह दोघे अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

October 18, 2026
अट्टल घरफोडी व चेन स्नॅचिंग करणारे २ सराईत गुन्हेगार जेरबंद ८.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

अट्टल घरफोडी व चेन स्नॅचिंग करणारे २ सराईत गुन्हेगार जेरबंद ८.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
Next Post
वाहेगाव येथे गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपशावर धाड २ कोटी २९ लाख चे साहित्य जप्त

वाहेगाव येथे गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपशावर धाड २ कोटी २९ लाख चे साहित्य जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

October 23, 2026
नांदेड मध्ये अवैध देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुण अटकेत

नांदेड मध्ये अवैध देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुण अटकेत

October 21, 2026
अवैध रेती वाहतुकीवर नांदेड पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक ४५ लाख २५ हजार मुद्देमाल जप्त प्रतिनिधी  माधव वाघमारे

अवैध रेती वाहतुकीवर नांदेड पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक ४५ लाख २५ हजार मुद्देमाल जप्त प्रतिनिधी  माधव वाघमारे

October 20, 2026
नांदेड ग्रामीण पोलिसांची धाड ६.४० लाखांचा मुद्देमाल जप्त ५ जणांवर गुन्हा दाखल

नांदेड ग्रामीण पोलिसांची धाड ६.४० लाखांचा मुद्देमाल जप्त ५ जणांवर गुन्हा दाखल

October 20, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved