नांदेड १६ ऑक्टोंबर( प्रतिनिधी – माधव वाघमारे)
नांदेड जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत नायगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने कत्तलीसाठी अत्यंत निर्दयतेने गोवंशाची अवैध वाहतूक करणारा महिंद्रा बोलेरो पिकअप पकडून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ५ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून वाहनासह सुमारे ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना?
नायगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना १५ ऑक्टोबर २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, एका महिंद्रा बोलेरो पिकअपमधून कत्तलीसाठी गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवून मौजे होटाळा, नरसी ते मुखेड जाणारे रोडवर सापळा रचला.
दरम्यान, संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप (क्रमांक: MH-26-AD-8227) अडवून पंचासमक्ष तपासणी केली असता, वाहनामध्ये अत्यंत दाटीवाटीने व निर्दयतेने दोरीने बांधून वाहतूक केली जात असलेली ५ गोवंश जनावरे आढळून आली.
५.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस पथकाने पंचासमक्ष कारवाई करत खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
- महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-26-AD-8227) अंदाजे किंमत रु. ४,००,०००/-
- ०५ गोवंश जातीची जनावरे – अंदाजे किंमत रु. १,१२,०००/-
- एकूण जप्त मुद्देमाल: रु. ५,१२,०००/-
दोघांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
- सय्यद अलीम चाँदसाब (चालक, वय ५० वर्षे, रा. बेटमोगरा ता. मुखेड)
- मोहीद्दीन अब्दुलसाब कुरेशी (वय ४९ वर्षे, रा. बेटमोगरा, ता. मुखेड)
या दोघांविरुद्ध पोलीस ठाणे नायगाव येथे गुन्हा रजि. नंबर १३७/२०२६, ‘प्राण्यांना क्रूरतेने वागवणूक प्रतिबंध कायदा’ कलम ११(१)(ड),(ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदर यशस्वी कारवाई नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी (बिलोली उपविभाग) मा. श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव पोलीस ठाण्याचे पोनि. महेश माळी, पोलीस अंमलदार माधव पवार, विनोद भंडारे व होमगार्ड यांनी पार पाडली.
पोलीस प्रशासनाचे आवाहन: गोवंशाची अवैध वाहतूक, प्राण्यांवर क्रूरता किंवा कत्तलीसाठी संशयास्पद पद्धतीने जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा ‘डायल ११२’ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी
– प्रतिनिधी: माधव वाघमारे












