aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, November 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, November 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

मुदखेड पोलिसांची धडक कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
November 14, 2026
in क्राईम
0
मुदखेड पोलिसांची धडक कारवाई
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विशेष प्रतिनिधी (माधव वाघमारे)

नांदेड १४ नोव्हेंबर नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेत मुदखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन आणि विनापरवाना वाहतूक विरोधात दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण ४८,३५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी ४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली कारवाई: मुगट पाटी रोडवर ८.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रभारी अधिकारी मुदखेड पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मुगट पाटी रोडवर एक टिपर वाहनामध्ये अवैधरीत्या रेतीची वाहतूक होत होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन एमएच-२६ एडी-२३१५ क्रमांकाच्या संशयित वाहनाची पाहणी केली असता, त्यात अंदाजे २ ब्रास रेती आढळून आली. संबंधitaंकडे रेती वाहतुकीची कोणतीही अधिकृत कागदपत्रे वा परवानगी नसल्याने ती अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी पंचासमक्ष सदर वाहन (किंमत ८,००,००० रुपये) आणि रेती (किंमत १०,००,००० रुपये) असा एकूण ८,१०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी १. विठ्ठल भुंजराव बोचरे (वय ४० वर्षे, रा. पाथर्डा, ता. मुदखेड) आणि वाहन मालक यांच्याविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २४३/२०२६, कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता, २०२३ सह कलम ४८(७), (८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई: महाटी ते माळकौठा जाणाऱ्या रोडवर ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

दुसऱ्या कारवाईत, महाटी ते माळकौठा जाणाऱ्या रोडवर एका संशयित वाहनाची (क्र. एमएच-२६ एडी-१९१८) तपासणी करण्यात आली. वाहनामध्ये अंदाजे ५ ब्रास रेती विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

या कारवाईत पोलिसांनी वाहन (किंमत ४०,००,००० रुपये) व रेती (किंमत २५,००० रुपये) असा एकूण ४०,२५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी १. संभाजी एकनाथ पवार (वय ३२ वर्षे, रा. आमदूरा, ता. मुदखेड) आणि वाहन मालक यांच्याविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २४५/२०२६, कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता, २०२३ सह कलम ४८(७), (८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाचा इशारा व नागरिकांना आवाहन

नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन, रेती चोरी आणि विनापरवाना वाहतूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सतत सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनखाली पोनि/गणेश कराड, पोउपनि/रमेश पुणेबोईनवाड, सुरेश जाधव, पोलीस अंमलदार चक्रधर, शिंदे, सुकनवार (सर्व नेमणूक मुदखेड) यांनी पार पाडली आहे.

दरम्यान, गोदावरी नदीपात्रात किंवा इतर ठिकाणी अवैध रेती उत्खनन, वाहतूक किंवा गौण खनिज चोरी होत असल्याचे तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळील पोलीस ठाण्यास किंवा पोलीस नियंत्रण कक्षास माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड (आशिष सिताराम बोराटे) यांनी केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

किनवट तालुक्यातील सिंगरवाडी शिवारामध्ये गांजाच्या शेतीवर मोठा छापा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

किनवट तालुक्यातील सिंगरवाडी शिवारामध्ये गांजाच्या शेतीवर मोठा छापा
क्राईम

किनवट तालुक्यातील सिंगरवाडी शिवारामध्ये गांजाच्या शेतीवर मोठा छापा

November 14, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध व्यवसायाविरुद्ध विशेष मास रेड मोहीम
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध व्यवसायाविरुद्ध विशेष मास रेड मोहीम

November 14, 2026
उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
क्राईम

उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

November 10, 2026
चोरीचे सोने विकायला आलेल्या चोराला श्रीनगरमध्ये सापळा रचून अटक
क्राईम

चोरीचे सोने विकायला आलेल्या चोराला श्रीनगरमध्ये सापळा रचून अटक

November 10, 2026
मानुसपुरी शेतशिवावर जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड १५ जणांवर गुन्हा दाखल  ४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मानुसपुरी शेतशिवावर जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड १५ जणांवर गुन्हा दाखल  ४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त

November 9, 2026
चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात
क्राईम

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

मुदखेड पोलिसांची धडक कारवाई

मुदखेड पोलिसांची धडक कारवाई

November 14, 2026
किनवट तालुक्यातील सिंगरवाडी शिवारामध्ये गांजाच्या शेतीवर मोठा छापा

किनवट तालुक्यातील सिंगरवाडी शिवारामध्ये गांजाच्या शेतीवर मोठा छापा

November 14, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध व्यवसायाविरुद्ध विशेष मास रेड मोहीम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध व्यवसायाविरुद्ध विशेष मास रेड मोहीम

November 14, 2026
उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

November 10, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved