नांदेड ८ जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ शिवाजीनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज डॉ. आंबेडकर नगर परिसरात भाजपाचे अधिकृत उमेदवार संदिप सोनकांबळे, मोहिनीताई येवनकर, कविताताई गड्डम व उमेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ भव्य सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेला माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजना, विकासात्मक धोरणे तसेच भाजपाच्या कार्यकाळातील शहर विकासाची कामे मतदारांसमोर मांडली. नांदेड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजपाचे उमेदवार सक्षम, अनुभवी व जनतेशी थेट जोडलेले असल्याचे त्यांनी नमूद केले.
उमेदवारांनीही आपल्या भाषणातून प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला. “जनतेच्या विश्वासावरच विकासाची पायाभरणी होते आणि तो विश्वास प्रामाणिक कामातूनच मिळवणार असे आश्वासन उमेदवारांनी दिले.
या प्रचार सभेला परिसरातील मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व सहभाग पाहता प्रभाग क्र. ८ मध्ये भाजपाला भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.












