aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 4, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home राजकारण

नांदेड ग्रामीण चे  पो नि चिंचोलकर यांची दबंग कामगिरी

Aawaz Times by Aawaz Times
January 4, 2026
in राजकारण
0
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. ४ जानेवारी २०२६ (प्रतिनिधी) माधव वाघमारे
अवैध गौण खनिज (वाळू) उत्खनन व वाहतुकीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि निर्णायक कारवाई करत १९ हायवा वाहने जप्त केली असून ३८ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण ११, कोटी २ लाख ९५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. असर्जन नाका ते भगतसिंग चौकडे जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करून संशयास्पद वाहने तपासली असता विनारॉयल्टी मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले.

या प्रकरणी गुन्हा क्रमांक ०८/२०२६ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३०३(२), १२५, ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८(७)(८) व पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जप्त करण्यात आलेल्या १९ हायवांपैकी विविध कंपन्यांची वाहने असून प्रत्येकी अंदाजे ५८ लाख रुपये किमतीची वाहने व त्यामधील वाळूचा समावेश आहे. वाहून नेण्यात येणाऱ्या वाळूचे प्रमाण व बाजारभाव लक्षात घेता एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ११ कोटी २ लाख ९५ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात कठोर भूमिका कायम राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

जनतेच्या हक्कासाठी जनसेवेचा नवा अध्याय प्रभाग क्रमांक ५ मधून उमेदवारांचा जाहीरनामा सादर

Next Post

महापालिका निवडणुकीसाठी सज्जता अंतिम टप्प्यात

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

राजकारण

पत्नीच्या सहीवर सत्ता आता नाही नगरसेवक पतींची ‘लुडबुड’ महागात थेट कारवाईचे आदेश

January 31, 2026
राजकारण

अजित पवार यांच्या विमानप्रवासाबाबत गंभीर प्रश्न LEARJET 45XR विमानावर आधीही अपघाताचे डाग

January 28, 2026
राजकारण

महत्त्वाच्या नेत्याच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवस कार्यालयीन कामकाज बंद

January 28, 2026
राजकारण

निर्भीड पत्रकार मुक्ता कदम यांनी उघड केली नांदेडच्या विकासकामांची पोलखोल शहरातील वास्तव मांडत प्रशासनाला आरसा

January 16, 2026
राजकारण

प्रभाग क्र. ८ शिवाजीनगरमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार डॉ. आंबेडकर नगरात सभेला मतदारांची मोठी गर्दी

January 8, 2026
राजकारण

प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मैदानात

January 7, 2026
Next Post

महापालिका निवडणुकीसाठी सज्जता अंतिम टप्प्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

नांदेड विभागात रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई एकाच दिवसात १,०८७ विनातिकीट प्रवासी गळाला ६ लाखांचा दणकट महसूल वसूल

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved