aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

महापालिका निवडणुकीसाठी सज्जता अंतिम टप्प्यात

Aawaz Times by Aawaz Times
January 5, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


नांदेड, दि. ०५ जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व काटेकोरपणे पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक नतिशा माथूर यांनी सोमवारी महापालिकेला भेट देत सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीत कायदा व सुव्यवस्था, मतदान व मतमोजणीची तयारी, सुरक्षा व्यवस्था तसेच आचारसंहिता अंमलबजावणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार तसेच मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य निवडणूक निरीक्षकांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध व नियमबद्ध पद्धतीने राबविण्याच्या सूचना दिल्या.

महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीच्या सुरुवातीस उपायुक्त नितीन गाढवे यांनी आतापर्यंत झालेल्या निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा सादर केला. छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्याने उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटपही सुरळीत पार पडल्याची माहिती देण्यात आली. तसेच उमेदवारांचा तपशील, मतपत्रिका छपाई, मतदान यंत्रांची तयारी, स्ट्राँग रूम व्यवस्था, क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, मतदान केंद्रांचा तपशील, मतदान व मतमोजणी प्रशिक्षण, टपाली मतदान, मतदान साहित्याचे वितरण, वाहतूक व्यवस्थापन, मतदार जनजागृती अभियान, आचारसंहिता अंमलबजावणी, तक्रार निवारण कक्ष व एकखिडकी कक्ष आदी सर्व बाबींची माहिती मुख्य निवडणूक निरीक्षकांसमोर मांडण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षकांनी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणे, EVM तयार करताना विशेष दक्षता घेणे, दारू, पैसे व इतर अमिषांचा वापर रोखणे, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व सुरक्षिततेचे सर्व निकष काटेकोरपणे पाळणे तसेच अवैध हालचालींना आळा घालण्यासाठी महामार्गांवरील तपासणी नाक्यांवर कडक वाहन तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील संवेदनशील भागांची माहिती घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.

यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पोलीस विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या कारवाईची माहिती दिली. प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंतर्गत सुमारे ६०० व्यक्तींना हद्दपार करण्यात आले असून ३३० व्यक्तींवर नॉन-बेलेबल वॉरंट बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अवैध मद्यसाठा व विक्रीप्रकरणी एकूण १७ गुन्हे दाखल करण्यात आले असून अवैध शस्त्रास्त्र बाळगण्याप्रकरणी ७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. संवेदनशील व अतिसंवेदनशील अशा २१ मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात येणार असून स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्रावरही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. तसेच पोलीस मुख्यालयात २४x७ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

चौकट :
वेब कास्टिंग व CCTV च्या करड्या नजरेखाली मतदान प्रक्रिया
एकूण मतदान केंद्रांपैकी २४७ मतदान केंद्रे परदानशिन असून, या ठिकाणी अतिरिक्त महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. परदानशिन मतदारांची ओळख पटवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था तसेच आर्थिक बाबींच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ७० मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय ६ किंवा त्यापेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या १४ इमारतींमधील एकूण ८८ बूथवर CCTV कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.

या बैठकीस सर्व अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी तसेच महापालिकेचे विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड ग्रामीण चे  पो नि चिंचोलकर यांची दबंग कामगिरी

Next Post

प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मैदानात

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण
आपलं नांदेड

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण

June 17, 2026
नांदेड येथे ‘पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ
आपलं नांदेड

नांदेड येथे ‘पीएलएफएस व एएसयुएसई राष्ट्रीय सर्वेक्षणाचा शुभारंभ

June 12, 2026
तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन
आपलं नांदेड

तालकटोरा स्टेडियम में गूंजेगा चलो दिल्ली का नारा 21 जून को ऑल इंडिया कोली समाज का 12वां राष्ट्रीय सम्मेलन

June 12, 2026
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन नांदेडमध्ये  आरोग्यदूत प्रशिक्षक कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन
आपलं नांदेड

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे प्रतिपादन नांदेडमध्ये  आरोग्यदूत प्रशिक्षक कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन

June 8, 2026
नांदेडमध्ये महसूल अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी महान्याय शिबीर कायद्याचे धडे गिरवत निर्णय प्रक्रिया होणार गतिमान
आपलं नांदेड

नांदेडमध्ये महसूल अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसाठी महान्याय शिबीर कायद्याचे धडे गिरवत निर्णय प्रक्रिया होणार गतिमान

June 6, 2026
मनपा आणि वृक्षमित्र फाउंडेशनचा पुढाकार मान्सूनमध्ये १८,००० वृक्ष लागवडीचा संकल्प
आपलं नांदेड

मनपा आणि वृक्षमित्र फाउंडेशनचा पुढाकार मान्सूनमध्ये १८,००० वृक्ष लागवडीचा संकल्प

June 6, 2026
Next Post

प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मैदानात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved