मुदखेड दि २६ ऑक्टोंबर(प्रतिनिधी – माधव वाघमारे)
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत, पोलीस स्टेशन मुदखेड पथकाने मौजे ईजळी शेतशिवातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर ‘अंदर बाहर’ जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ३,१७,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ०९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस स्टेशन मुदखेड प्रभारी अधिकारी यांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजे ईजळी रेल्वे पाटीरीच्या जवळ शेतशिवार मोकळ्या जागेत काही इसम बेकायदेशीररीत्या ‘अंदर बाहर’ नावाचा जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता, खालील आरोपी मिळून आले: १. मोहम्मद सलमान मोहम्मद युनुस, वय ३० वर्षे, रा. नवी आबादी, मुदखेड २. कपिल सोपान हटकर, वय २८ वर्षे, रा. ईजळी ३. गजानंद उत्तमराव कळणे, वय ३९ वर्षे, रा. सरेगाव, ता. मुदखेड ४. कृष्णा गणेश पवार, वय २१ वर्षे, रा. निवधा, ता. मुदखेड ५. रामप्रसाद नारायण मुचकलवाड, वय २७ वर्षे, रा. मेडका, ता. मुदखेड ६. अरविंद बाबाराव मुंगल, वय २८ वर्षे, रा. ईजळी, ता. मुदखेड ७. गंगाधर लोंढे, रा. बार्ड ८. राष्ट्रपाल दीगंबर हटकर, रा. ईजळी, ता. मुदखेड ९. बालु पवार, रा. निवधा, ता. मुदखेड
३ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त आरोपींकडून व घटनास्थळावरून पोलिसांनी पंचासमक्ष कारवाई करून चार मोबाईल फोन (अंदाजे किंमत ४०,०००/-), चार मोटारसायकल (MH-26-CL-1113, MH-26-BJ-8839, MH-26-AN-6005) तसेच एक विना नंबर मोटारसायकल (अंदाजे किंमत २,७०,०००/-), रोख रक्कम ७,५००/- व जुगाराचे साहित्य असा एकूण ३,१७,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर प्रकरणी नमूद आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे मुदखेड येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २२०/२०२६ कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचे आवाहन सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील (भोकर) व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश नंद, आकाश सरोदे, सुरेश जाधव व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार भिसե, पुणेबोईन्वाड आणि होमगार्ड (सर्व नेमणूक मुदखेड पोलीस ठाणे) यांनी पार पाडली. जिल्ह्यात अवैध जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर प्रकाराविरुद्ध पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध हालचालींची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे.











