नांदेड दि. ६ नोव्हेंबर २०२५ : (प्रतिनिधी) माधव वाघमारे सिडको गुरुवार बाजारपेठेत अवैध घातक शस्त्र बाळगून व्यापारी व शेतकऱ्यांना धमकावत पैसे उकळणाऱ्या दोघा युवकांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करून अटक केली असून आरोपींना जेलबंद करण्यात आले आहे.
नांदेडचे पोलीस अधीक्षक माननीय श्री. अविनाश कुमार यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगून फिरणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश सर्व पोलीस स्टेशनना दिले होते. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री. ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.
पथकातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड, उपनिरीक्षक व्यवहारे, पोलिस कर्मचारी वसंत केंद्रे, गजानन पेनापल्ले व मारुती पचलिंग हे पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रांमार्फत माहिती मिळाली की गुरुवार बाजार परिसरात काही युवक व्यापारी व शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी करत आहेत.
तत्काळ पथकाने छापा टाकून आरोपी
रणज्योतसिंग उर्फ बच्चू सिंग सतनामसिंग बावरी (वय १९, रा. गोविंद कॉलनी, नांदेड सय्यद सलमान उर्फ भुऱ्या सय्यद बाबू मिया (रा. एन डी 24 फिरदोस नगर हडको, नांदेड)
यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून अवैध घातक शस्त्र हस्तगत करण्यात आले.
या कारवाईत जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरू, इतवारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत शिंदे व नांदेड ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री. ओमकांत चिंचोलकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.












