नांदेड, दि. ८ नोव्हेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत दाखल असलेल्या खुनाच्या सिडको भागातील बालाजी मंदिर राहणारा दोन तरुणांमध्ये वाद झाला असून मयत शुभम हेंद्रे चा खून साईनाथ सुभाष वट्टमवार यांनी केला असून आरोपीस अवघ्या २४ तासांच्या आत अटक करत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा त्यांची कार्यक्षमता सिद्ध केली आहे.
ग्रामीण गुन्हा क्र. 1060/2025 कलम 103 (1), 352, 351(2), 351(3), मा.न.सा. 2023 स.रु. 3(2)(ब)(क), 3(1)(आ), (एस) अ. ज.अ. प्रि. अधिनियम अशा गंभीर गुन्ह्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली.
अटक आरोपी –
साईनाथ सुभाष वट्टमवार, वय 19 वर्षे, रा. संभाजी चौक ND-41 सिडको, ता. जिल्हा नांदेड.
कार्यवाही :
दिनांक 07 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी प्राप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या मुख्य कार्यकारी पथकासह समन्वय साधून आरोपीस शोध लावला. तपासात आरोपीस गुन्यातील सहभाग सिद्ध होताच त्यास ताब्यात घेऊन पुढील कडक चौकशी करण्यात येत आहे.
या यशस्वी कारवाईसाठी
- मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड
- सौ. श्रीमती अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर
- श्री. सूरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड
यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रत्यक्ष कारवाईमध्ये सहभाग
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय यांच्या पथकासह नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील तपासनीस व अधिकारी वर्ग यांनी संयुक्तरीत्या ही धडक मोहीम राबवली.
पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांनी सांगितले की
“गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपीस त्वरेने गजाआड करणे व कायदेशीर प्रक्रियेतून कठोर शिक्षा होणे हेच आमचे उद्दिष्ट असून या दिशेने पोलिस यंत्रणा सदैव सज्ज आहे.”
या धडक मोहीमेमुळे जिल्ह्यात भयमुक्त वातावरण निर्मितीस बळकटी मिळाली आहे.












