नांदेड, दि. 8 डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे बिलोली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मौजे कारला परिसरातील शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री धाड टाकत बारा जुगार्यांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण ₹2,34,300 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस ठाणे बिलोली येथे गुन्हा क्रमांक 298/2025, कलम 12 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
🔹 उच्च अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही धडक मोहीम माननीय
- श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड
- श्रीमती अर्चना पाटील, पोलीस अधीक्षक भोकर
- श्री. सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड
- श्री. श्याम पानेगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, बिलोली
यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. प्रत्यक्ष कारवाई गजानन तोटेवाड, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन नायगाव तसेच नायगाव व रामतीर्थ येथील पोलिस पथकाने केली.
🔹 जुगार खेळणारे 12 आरोपी ताब्यात
जुगार अड्ड्यावरून खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आलेः
- रमेश सायलू जुटू (वय 40)
- संदीप नागेंद्र मलेफुला (वय 33)
- गंगाराम वरणी (वय 58)
- ज्ञानेश्वर बुम घोडा गौरला (वय 37)
- संतोष रामलू मलेफुला (वय 45)
- वडेपा मस्के (वय 42), रा. बोधन, जिल्हा निजामाबाद
- नागनाथ धोंडीबा जामनूर (वय 38), रा. कारला, बिलोली
- रमेश राजाराम मलशेतवाड, रा. सगरोळी, ता. बिलोली
- संतोष दत्ताराव सोनपुरे, रा. सगरोळी, ता. बिलोली
- सदाम पिंजारी, रा. कारला, ता. बिलोली
- महादेव (कारला)
- इतर दोन इसमांची नावे नोंदली आहेत
🔹 जप्त केलेला मुद्देमाल
कारवाईत पोलिसांनी खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त केला
- नगदी: ₹87,000
- मोबाईल फोन: 10
- मोटरसायकल: 1
- जुगार साहित्य: विविध साहित्य
- एकूण मुद्देमाल: ₹2,34,300
🔹 जुगार अड्ड्यावरील कारवाई कशी घडली?
दिनांक 7 डिसेंबर रोजी वरिष्ठांना खात्रीलायक माहिती मिळाली की मौजे कारला येथे राजू पाटील यांच्या शेताजवळ, मांजरा नदी पात्रात काही इसम जुगार खेळत आहेत. सदर माहितीच्या आधारे पोलिस पथकाने छापा टाकत सर्व आरोपींना ताब्यात घेतले.
🔹 पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा गौरव
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पथकातील अधिकारी व अमलदारांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.












