aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, August 5, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

अवैध वाळू माफियांना जोरदार दणका

Aawaz Times by Aawaz Times
December 27, 2025
in क्राईम
0
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. २७ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेत कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी त्रिकुट परिसरात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत सुमारे ३५ लाख रुपये किमतीचा अवैध वाळू उत्खननाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, त्यामुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने पहाटे ६ वाजता त्रिकुट परिसरात गस्त घातली. त्रिकुट संगमाजवळ अवैधरित्या रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच पथकाने तत्काळ कारवाई केली.

या कारवाईदरम्यान ३ मोठ्या बोटी व १ लहान बोट अवैध वाळू उत्खननासाठी वापरात असल्याचे आढळून आले. पथकाने मजुरांच्या मदतीने २ मोठ्या बोटी पाण्यात बुडवून टाकल्या, तर १ मोठी बोट व १ लहान बोट जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट करून नष्ट करण्यात आली. या कारवाईत एकूण ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

या धडक कारवाईत मंडळ अधिकारी संतोष अस्कुलकर, अनिरुद्ध जोंधळे, मोहसीन सय्यद, प्रमोद बडवने, तसेच ग्राम महसूल अधिकारी माधव भिसे, गौतम पांढरे, एम.के. पाटील, मनोज जाधव, मनोज सरपे, दिलीप पवार, आढाव, मोहन कदम, सचिन उपरे, रमेश गिरी, माधव शिराळे आणि महसूल सेवक शिवा तेलंगे यांचा सहभाग होता.

दरम्यान, अवैध वाळू उत्खनन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही असा स्पष्ट इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे. महसूल प्रशासनाची ही कारवाई पुढेही अधिक तीव्र स्वरूपात सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाच्या कठोर भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड ग्रामीणमध्ये गुन्हेगारीवर कडक कारवाई गंभीर गुन्ह्यातील आरोपीला MPDA अंतर्गत स्थानबद्ध करून लातूर येथे रवानगी

Next Post

नांदेड महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला वेग पहिल्याच दिवशी २५ अर्ज दाखल

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी
Uncategorized

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
Next Post

नांदेड महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेला वेग पहिल्याच दिवशी २५ अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

August 5, 2026
यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved