aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, April 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त महापौरांनी राबविली स्वच्छता मोहीम स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

Aawaz Times by Aawaz Times
February 23, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. २३ (प्रतिनिधी: माधव वाघमारे): “स्वच्छता हाच खरा देव” या राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी, त्यांच्या जयंतीनिमित्त आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे नेतृत्व महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी केले असून, त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन चैतन्य नगर परिसरात स्वच्छता करत नागरिकांना आदर्श उदाहरण घालून दिले.

गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या विशेष मोहिमेंतर्गत महापौरांनी सकाळी चैतन्य नगर परिसरातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांना भेट देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी केली आणि कर्मचाऱ्यांसमवेत थेट सफाई कार्यात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या सोबत महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, नगरसेवक सतीश देशमुख, सहाय्यक आयुक्त मोहम्मद गुलाम सादिक तसेच मनपाचे विविध अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना महापौर सौ. कविता मुळे म्हणाल्या, “राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी आयुष्यभर सामाजिक प्रबोधनासोबतच स्वच्छतेवर भर दिला. त्यांनी दाखवलेला हा मार्ग आपण सर्वांनी अंगिकारला पाहिजे. केवळ जयंतीच्या दिवशीच नव्हे, तर प्रत्येक दिवस आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी समर्पित असायला हवा. स्वच्छतेमुळेच निरोगी समाजाची निर्मिती होते.”

कार्यक्रमाच्या शेवटी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र योगदान देणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महापौरांच्या हस्ते या कर्मवीरांचा गौरव करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व इतर साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करताना महापौरांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

याचबरोबर शहरातील इतर प्रभागांतही नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत साचलेला कचरा उठवणे, नाल्यांची स्वच्छता करणे आणि रस्त्यांवरील घाण दूर करण्यात आली. यानिमित्ताने महानगरपालिकेने नागरिकांना कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देत घरगुती कचरा ओला व सुका असा वेगळा करून देण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण न करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून नागरिकांना स्वच्छतेची शपथ दिली गेली, तर आभार स्वच्छता निरीक्षक यांनी मानले. या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती झाली असून, नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड विभागात RPF ची मोठी कारवाई

Next Post

हद्दपार आदेशाचा भंग बळीरामपूरमध्ये संघर्ष पवळे खंजरासह जेरबंद

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026
आपलं नांदेड

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026
आपलं नांदेड

राज्यात वाहनचालकांच्या कॉल मध्ये नांदेड जिल्हा आघाडीवर एकूण ३,२९५ अर्जांपैकी एकट्या नांदेडचे ४८२ कॉल्स

April 11, 2026
आपलं नांदेड

नांदेड रेल्वे विभागात थर्ड आय सक्रीय एकाच दिवसात ९५४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

April 11, 2026
आपलं नांदेड

अहोरात्र सेवा बजावूनही १०२ रुग्णवाहिका चालक उपेक्षित कायमस्वरूपी नोकरी अन् विम्याविनाच सुरू आहे जीवघेणा प्रवास

April 11, 2026
आपलं नांदेड

जनगणनेची अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करा

April 11, 2026
Next Post

हद्दपार आदेशाचा भंग बळीरामपूरमध्ये संघर्ष पवळे खंजरासह जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved