aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
March 21, 2026
in क्राईम
0
0
SHARES
77
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड : २१ मार्च प्रतिनिधी माधव वाघमारे

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी चोरी, घरफोडी व दरोड्यासारखे गुन्हे उघडकीस आणण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करत भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत कौशल्याने अवघ्या १२ तासांच्या आत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून, १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १९ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री एच.पी. पेट्रोल पंपासमोरून चार हायवा गाड्यांच्या ८ बॅटऱ्या चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५४/२०२६ कलम ३०३ (२) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख व त्यांच्या पथकाने तातडीने तपास चक्राला गती दिली.
असा लागला छडा
तपास सुरू असतानाच गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक संशयित तरुण युनिकॉर्न गाडीवर पूर्णा रोड परिसरातील एच.पी. पेट्रोल पंपाजवळ फिरत आहे. पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून सदर तरुणाला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने आपले नाव किरपालसिंग पि शेरसिंग टाक (वय २५ वर्षे, रा. विष्णुनगर, नांदेड) असल्याचे सांगितले. अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

  • हायवा गाड्यांच्या ८ बॅटऱ्या: किंमत अंदाजे ९६,०००/- रुपये.
  • गुन्ह्यात वापरलेली मोसा (मोटार सायकल): किंमत ९०,०००/- रुपये.
  • एकूण जप्त मुद्देमाल: १,८६,०००/- रुपये (१०० टक्के रिकव्हरी).
    यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
    ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अर्चणा पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. रामेश्वर वंजने आणि प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक मा. श्री. शशांक एन. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
    तपास पथकात भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश माळी, पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख यांच्यासह नरेश वाडेवाले, विशाल माळवे, गजानन किडे, मरदोडे, विष्णू मुंडे, राहुल लाटकर, नागनाथ चापके, राजीव घुले, आदनान पठाण आणि अंकुश कांबळे या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
    या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक चंद्रकांत सोनटक्के करत आहेत
Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेस आता श्री गंगानगरपर्यंत धावणार प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय

Next Post

मुक्राबाद पोलिसांची मोठी कारवाई २२ लाखांच्या मुद्देमालासह तिरट जुगारावर छापा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post

मुक्राबाद पोलिसांची मोठी कारवाई २२ लाखांच्या मुद्देमालासह तिरट जुगारावर छापा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved