नांदेड: २४ मार्च प्रतिनिधी माधव वाघमारे
जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध नांदेड पोलिसांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत धडक मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) भोकर फाटा आणि खुजडा शिवार भागातील गोदावरी नदी पात्रात छापा टाकून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन हायवा टिप्परसह एकूण ४९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक २३ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नांदेड जिल्ह्यात पेट्रोलिंग करत असताना, गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू चोरी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भोकर फाटा व खुजडा शिवार परिसरात सापळा रचून धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरून दोन हायवा टिप्पर आणि १० ब्रास रेती जप्त करण्यात आली.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
- दोन हायवा टिप्पर: (क्रमांक MH-21-CH-2360 आणि MH-26-BE-1718) – किंमत ४९,००,००० रुपये.
- गौण खनिज (रेती): १० ब्रास – किंमत ५०,००० रुपये.
- एकूण मुद्देमाल: ४९,५०,००० रुपये.
दोषींवर गुन्हे दाखल:
या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर अर्धापूर आणि मुदखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ४७, ४८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपींची नावे:
१) अंबादास गणेश बैने (वय २२ वर्षे, रा. ब्राह्मणवाडा, ता. जि. नांदेड)
२) लक्ष्मण बालाजी गणपोपलवाड (वय ३० वर्षे, रा. बोळसा, ता. उमरी)
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार (IPS), अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सपोउपनि दारासिंग राठोड, पोहेकॉ मोहन हाक्के, पोकॉ लहू चाटे, विठ्ठल वैद्य व पथकाने केली आहे.
या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पथकाचे कौतुक केले असून, अवैध धंद्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई सुरू राहील असा इशारा दिला आहे.












