aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

खंजरचा धाक दाखवून १०,५०,००० लाखांची बॅग लुटणारी दरोडेखोरांची टोळी गजाआड

Aawaz Times by Aawaz Times
June 16, 2026
in क्राईम
0
खंजरचा धाक दाखवून १०,५०,००० लाखांची बॅग लुटणारी दरोडेखोरांची टोळी गजाआड
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड १६ जून प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा.श्री. अबिनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ अंतर्गत जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे कडक आदेश दिले होते. या मोहिमेला वजिराबाद गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले असून, गेल्या अडीच महिन्यांपासून फरार असलेला जळजळीत दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

नेमकी घटना काय होती?

३० मार्च २०२६ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास फिर्यादी सोहनलाल मोतीलालजी परमार (वय ४० वर्षे, रा. जालना) यांच्या नांदेड येथील जुना मोंढा भागातील ‘मा. आरबुंडा ट्रेडिंग’ नावाच्या आडत ऑफिसमध्ये तीन अनोळखी इसम घुसले. त्यांनी ऑफिसमध्ये काम करणारे शिवहार पतरावाळे यांना खंजरचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली आणि ऑफिसमधील १०,५०,०००/- (दहा लाख पन्नास हजार) रुपये असलेली रोख रकमेची बॅग जबरदस्तीने चोरून नेली होती. याप्रकरणी १ एप्रिल २०२६ रोजी पोलीस स्टेशन वजिराबाद येथे गुरनं. १३९/२०२६ कलम ३१०(२), ३०९(४), ३(५) भारतीय न्याय संहिता सहकलम ४/२५ शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी झाली आरोपीला अटक

हा गुन्हा घडल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत फरार होते. १५ जून २०२६ च्या रात्री ११:०० ते १६ जून २०२६ च्या पहाटे ३:०० वाजेच्या दरम्यान वजिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत डी.बी. पथकाचे अधिकारी व अंमलदार कोंबिंग ऑपरेशन राबवत होते. यादरम्यान, या दरोड्यातील अडीच महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी किशन ऊर्फ बन्ना पि. राजू कुरील (वय २२ वर्षे, रा. गायत्री मंदिराजवळ, जुना मोंढा, नांदेड) हा गायत्री मंदिराजवळील पुलाजवळ संशयास्पद रितीने थांबल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली व संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने वजिराबाद पोलीस ठाण्यात नोंद असलेला सदर दरोड्याचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला रीतसर अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल बुलंगे करत आहेत.

या पथकाने केली कामगिरी

सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक मा.श्री. अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक मा.श्री. सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक (भोकर) मा.श्रीमती अर्चना पाटील, आणि उप विभागीय पोलीस अधिकारी मा.श्री. रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबादचे पोलीस निरीक्षक श्री. अजित कुंभार, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुनिल बुलंगे आणि पोलीस अंमलदार पोहेकॉ/१२१८ शिवसांब मठपती, पोहेकॉ/२५४३ हबीब चाऊस, पोहेकॉ/२२३६ अजय यादव, पोकॉ/१५४ संतोष पोकळे, पोकॉ/१९३४ संतोष पावडे, पोकॉ/३०८० विलास कदम, पोकॉ/१४ भाऊसाहेब राठोड आणि पोकॉ/४६७ जसविंदरसिंग चिमा यांनी केली आहे.
या धडक कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक मा.श्री. अबिनाश कुमार यांनी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.
विशेष रिपोर्ट
प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

जमिनीची मोजणी एनए आणि तांत्रिक कामांना मिळणार वेग जिल्ह्यात तीन नवीन भूमी अभिलेख कार्यालये सुरू

Next Post

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड महानगरपालिकेच्या वतीने अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved