aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेडमध्ये इतवारा पोलिसांची मोठी कारवाई अवैध गावठी पिस्तूल बाळगणारा एक आरोपी जेरबंद

Aawaz Times by Aawaz Times
July 24, 2026
in क्राईम
0
नांदेडमध्ये इतवारा पोलिसांची मोठी कारवाई अवैध गावठी पिस्तूल बाळगणारा एक आरोपी जेरबंद
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २४ जुलै ( प्रतिनिधी माधव वाघमारे)
शहर व जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड शहरात राबविण्यात येत असलेल्या विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’दरम्यान इतवारा पोलीस ठाण्याच्या पथकाने एका तरुणाला अवैध गावठी पिस्तूलासह रंगेहात पकडत बेड्या ठोकल्या आहेत.

काला पूल परिसरात रचला सापळा

नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली शहरात कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. २३ जुलै २०२६ रोजी इतवारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जळबाजी गायकवाड व त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, गाडीपुरा ते गौतमनगर जाणाऱ्या रस्त्यावरील ‘काला पूल’ परिसरात एक इसम बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल बाळगून फिरत आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचांसमक्ष सापळा रचला आणि संशयित इसमाला ताब्यात घेतले.

३० हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त

पोलीस चौकशीत संशयिताने आपले नाव अयान बेग पी. युसुफ बेग (वय २४ वर्षे, रा. पाकिजा नगर, टायर बोर्ड, देगलूर नाका, जुने पोस्ट ऑफिसजवळ, बेल मार्केट, इतवारा, नांदेड) असे सांगितले. पोलिसांकडून त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कंबरेला खोचलेले सुमारे ३०,००० रुपये किमतीचे एक सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्तूल (अग्निशस्त्र) आढळून आले. सदर शस्त्राबाबत वैध परवान्याची विचारणा केली असता तो कोणताही परवाना सादर करू शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शस्त्र जप्त केले.

अग्निशस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन इतवारा येथे अपराध क्र. २५५/२०२६, कलम ३/२५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि जळबाजी गायकवाड हे करत आहेत.

पोलीस पथकाची धडक कारवाई

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, संजय शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक जळबाजी गायकवाड आणि पोलीस अंमलदार बंडू कलंदर, हरप्रितसिंग सुखई, ईसराईल शेख, साहेबराव जगताप, कोरनुळे (सर्व नेमणूक इतवारा पोलीस ठाणे) यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

नांदेड पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
नांदेड पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही व्यक्तीकडे अवैध शस्त्रे किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

गुरुद्वारा सचखंड बोर्डातील गैरव्यवहारांवरून वातावरण तापले खोट्या अहवालांचे खंडन करत २४ जुलैला धरणे आंदोलनाचा इशारा

Next Post

संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्री विशेष कोंबिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्री विशेष कोंबिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्री विशेष कोंबिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved