aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Sunday, November 8, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Sunday, November 8, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home शिक्षण

डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने स्वारातीम विद्यापीठातील दोन प्राध्यापकांचा गौरव

Aawaz Times by Aawaz Times
September 9, 2026
in शिक्षण
0
डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने स्वारातीम विद्यापीठातील दोन प्राध्यापकांचा गौरव
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी ९ सप्टेंबर(माधव वाघमारे)

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठित ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ स्वारातीम विद्यापीठातील दोन वरिष्ठ प्राध्यापकांना जाहीर झाला असून मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्तावाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत वर्ष २०२४-२५ साठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार आणि वर्ष २०२५-२६ साठी नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांना हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव हा पुरस्कार महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि कला शिक्षण संचालक डॉ. किशोर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रशासकीय गतिशीलता अन् संशोधनाला बळ विद्यापीठ कार्यक्षेत्रात प्रशासकीय गतिशीलता व पारदर्शकता आणणे, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम राबवणे, संशोधन संस्कृतीचा विकास करणे तसेच विविध शैक्षणिक भागीदारींच्या माध्यमातून गुणवत्ता वाढवणे यासाठी कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार व डॉ. शैलेश वाढेर यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या समर्पक कार्याची राज्य शासनाने दखल घेतल्याने विद्यापीठाची मान उंचावली आहे.

विद्यापीठ वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव या उल्लेखनीय यशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी दोन्ही पुरस्कारार्थींचे विशेष अभिनंदन केले. यासोबतच विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अधिसभेचे सदस्य, प्राध्यापक आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी डॉ. पवार व डॉ. वाढेर यांचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाला सलग दोन वर्षांसाठी हा प्रतिष्ठित राज्य पुरस्कार मिळणे ही अत्यंत अभिमानास्पद आणि समाधानाची बाब आहे. यामुळे विद्यापीठाचा शैक्षणिक क्षेत्रातील नावलौकिक अधिक दृढ झाला आहे.” — विद्यापीठ प्रशासन

“हा सन्मान आम्ही आमचे विद्यार्थी, सहकारी आणि समाजाला समर्पित करतो. नियमित अध्यापन, संशोधन आणि विद्यापीठाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करत राहणे हीच आमची खरी ओळख आहे.” — डॉ. ज्ञानेश्वर पवार व डॉ. शैलेश वाढेर (पुरस्कारार्थी)

या राज्यस्तरीय सन्मानामुळे विद्यापीठ कार्यक्षेत्रात उच्च शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होणार असून, इतर प्राध्यापक व संशोधकांसाठी ही उपलब्धी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

Tags: Trump Inauguration
ShareSend
Previous Post

क्रांतिसूर्य आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना नांदेड महानगरपालिकेत अभिवादन

Next Post

वृद्ध महिलेची फसवणूक करून सोन्याचे दागिने लुटणारे २ भामटे जेरबंद नांदेड स्थानिक गुन्हे शाखची धडक कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

पालकांनो सावध व्हा मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या संगती अन् वर्तनाकडे द्या लक्ष
शिक्षण

पालकांनो सावध व्हा मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या संगती अन् वर्तनाकडे द्या लक्ष

October 29, 2026
विद्रोह शिक्षणाचा
शिक्षण

विद्रोह शिक्षणाचा

July 20, 2026
अकृषिक आणि शैक्षणिक क्षेत्राच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करूया कुलगुरू डॉ. मनोहर चासकर
शिक्षण

अकृषिक आणि शैक्षणिक क्षेत्राच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करूया कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

July 13, 2026
शिक्षण

व्यवसायात प्रगतीसाठी शिका प्रभावी इंग्रजी स्वारातीम विद्यापीठात इंग्रजी संवाद कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू

March 24, 2026
शिक्षण

स्वारातीम’ विद्यापीठात पारंपारिक दिवस व Pi Day उत्साहात साजरा

March 16, 2026
शिक्षण

मराठीतूनच संवाद साधा भाषेचा अभिमान जपा अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांचे आवाहन

February 27, 2026
Next Post
वृद्ध महिलेची फसवणूक करून सोन्याचे दागिने लुटणारे २ भामटे जेरबंद नांदेड स्थानिक गुन्हे शाखची धडक कारवाई

वृद्ध महिलेची फसवणूक करून सोन्याचे दागिने लुटणारे २ भामटे जेरबंद नांदेड स्थानिक गुन्हे शाखची धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved