नांदेड दिनांक २७ ऑक्टोंबर
महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी बांधवांना मदतीचा हातभार लावण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत स्तुत्य पहल केली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या एका दिवसाचा पगार जमा करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत नांदेडमधील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. शासनाने केवळ एका दिवसाचा पगार देण्याचे आवाहन केले असताना, चिंचोलकर यांनी एका दिवसाऐवजी आपला संपूर्ण एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला आहे.
पावसाअभावी राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत हलाखीच्या आणि संकटाच्या स्थितीतून जात आहे. अशा कठीण समयी शासनाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याच्या उद्देशाने चिंचोलकर यांनी घेतलेला हा निर्णय केवळ कौतुकास्पदच नाही, तर इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीही मोठा प्रेरणादायी ठरला आहे.
त्यांच्या या संवेदनशील आणि मानवतावादी पावलाचे सर्व स्तरातून जोरदार स्वागत व कौतुक होत आहे.
प्रतिनिधी: माधव वाघमारे











