aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

आरपीएफ नांदेडची मोठी कारवाई रेल्वे मालमत्तेची चोरी करणारा अटकेत तर हरवलेल्या मुलीला मिळाले मायेचे छत्र

Aawaz Times by Aawaz Times
April 22, 2026
in क्राईम
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड |२२ एप्रिल प्रतिनिधी: माधव वाघमारे

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) आपली कार्यतत्परता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. परभणी आणि छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये आरपीएफने रेल्वे मालमत्ता चोरणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत, तर दुसऱ्या घटनेत एका हरवलेल्या अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करून तिला पालकांच्या स्वाधीन केले आहे.

रेल्वे यार्डात चोरीचा प्रयत्न उधळला; ५२ किलो साहित्य जप्त

‘ऑपरेशन रेल सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत २० एप्रिल २०२६ रोजी परभणी रेल्वे स्थानक परिसरात आरपीएफने धडक कारवाई केली. सकाळी ११:१५ च्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वावळे आणि हेड कॉन्स्टेबल महेंद्रसिंग चव्हाण हे यार्ड परिसरात गस्त घालत होते. यावेळी एका संशयित व्यक्तीची हालचाल पाहून त्यांनी त्याला ताब्यात घेतले.
तपासणी केली असता, संबंधित व्यक्तीकडे ५२ किलो वजनाच्या रेल्वे फिश प्लेट्स आणि ३ पेंड्रोल क्लिप असलेली एक मोठी पिशवी आढळली. ‘राधे’ (रा. परभणी) असे या आरोपीचे नाव असून, रेल्वे मालमत्तेबाबत विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. अखेर त्याने चोरीची कबुली दिली. याप्रकरणी परभणी आरपीएफ पोस्टमध्ये गुन्हा क्रमांक ०१/२०२६ नुसार ‘रेल्वे मालमत्ता अधिनियम १९६६’ च्या कलम ३(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑपरेशन नन्हे फरिश्ते १६ वर्षीय मुलीची आईशी भेट

दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर माणुसकीचे दर्शन घडले. २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता महिला प्रतीक्षालयात एक १६ वर्षांची मुलगी एकटीच बसलेली महिला कॉन्स्टेबल छोटी पुनिया आणि जीआरपीचे हेड कॉन्स्टेबल पंकज दिघोळे यांना आढळली.
संशयास्पद स्थिती पाहून तिची विचारपूस केली असता ती घर भरकटल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तातडीने तिच्या आईशी संपर्क साधला. काही वेळातच तिची आई स्थानकावर पोहोचली. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या मुलीला सुरक्षित पाहून मातेच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले आणि त्यांनी रेल्वे प्रशासनाचे मनापासून आभार मानले.

प्रशासनाचे आवाहन: > रेल्वे मालमत्तेचे नुकसान करणे हा गंभीर गुन्हा असून अशा कृत्यांपासून दूर राहावे. तसेच प्रवाशांनी स्थानक परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास त्वरित आरपीएफला कळवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

तेलंगणातून येणारा १३ लाखांचा गांजा जप्त १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

नांदेड जिल्ह्यात तीन दिवस यलो अलर्ट वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले
क्राईम

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात
क्राईम

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
क्राईम

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026
भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
क्राईम

भाग्यनगर आणि रामतीर्थ पोलिसांकडून जबरी चोरीचे गुन्हे उघड ५ लाख १५ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद

June 18, 2026
२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक
क्राईम

२ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा पत्नीसह प्रियकराला अटक

June 18, 2026
Next Post

नांदेड जिल्ह्यात तीन दिवस यलो अलर्ट वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved