aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
August 4, 2026
in क्राईम
0
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
0
SHARES
209
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ४ ऑगस्ट ( प्रतिनिधी/माधव वाघमारे)

नांदेड जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालणे, सराईत गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नांदेड पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ३ ऑगस्ट २०२६ च्या रात्री ११:०० वाजेपासून ते ४ ऑगस्ट २०२६ च्या पहाटे ०३:०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात विशेष ‘काँम्बिंग ऑपरेशन’ राबवण्यात आले.

या विशेष मोहिमेत मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार, अवैध शस्त्रे बाळगणारे, हद्दपार, तडीपार, हिस्ट्रीशीटर, तसेच पाहिजे व फरार आरोपींची सखोल पडताळणी करून धरपकड करण्यात आली.

कारवाईचा ताळेबंद (एक दृष्टिक्षेप):

  • अधिकारी व अंमलदार तैनात: ६३ पोलीस अधिकारी व २२१ पोलीस अंमलदार.
  • तडीपार/प्रस्तावित गुन्हेगार तपासले: ३४ गुन्हेगार (कलम ५५, ५६, ५७ मधील).
  • MPDA मधून सुटलेले गुन्हेगार: ३१ जण चेकिंगच्या जाळ्यात.
  • सराईत गुन्हेगारांची तपासणी: ९१ गुन्हेगारांची सखोल झाडाझडती.
  • दाखल गुन्हे: आर्म ॲक्टप्रमाणे ०२ गुन्हे, तर म.पो.का. कलम १२२ अन्वये ०४ गुन्हे.
  • वॉरण्ट बजावणी: ३० जामीनपात्र (BW) आणि १४ गैरजामीनपात्र (NBW) वॉरण्ट बजावण्यात आले.
  • समन्स बजावणी: तब्बल ५८ समन्स बजावण्यात आले.

काँम्बिंग ऑपरेशनदरम्यान दाखल झालेले प्रमुख गुन्हे:

  1. स्थागुशा – शिवाजीनगर: गुरनं ३४४/२६, कलम ४/२५ भा.ह.का. (०२ आरोपी)
  2. विमानतळ पोलीस ठाणे: गुरनं ३६२/२६, कलम ४/२५ भा.ह.का. (०१ आरोपी)
  3. वजिराबाद पोलीस ठाणे: गुरनं ३९२/२६, कलम १२२ म.पो.का. (०१ आरोपी)
  4. भाग्यानगर पोलीस ठाणे: गुरनं ४१५/२६, कलम १२२ म.पो.का. (०१ आरोपी)
  5. भाग्यानगर पोलीस ठाणे: गुरनं ४१६/२६, कलम १२२ म.पो.का. (०२ आरोपी)
  6. भाग्यानगर पोलीस ठाणे: गुरनं ४१७/२६, कलम १२२ म.पो.का. (०१ आरोपी)

पोलीस दलाची मोठी यंत्रणा मैदानात

सदर विशेष मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक भोकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) नांदेड येथील अधिकारी व अंमलदार तसेच RCP पथकाने सक्रिय सहभाग घेऊन व्यापक तपासणी मोहीम फत्ते केली.

या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सडेतोड इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना मनपात अभिवादन अवयवदानाचा घेतला संकल्प

Next Post

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved