दिनांक : 16 नोव्हेंबर 2025 (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड ग्रामीण पोलिसांनी आज पहाटे अत्यंत योजनाबद्ध आणि संयुक्तपणे मोठी मोहीम राबवत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई मा पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी केली.
- कलम 142 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत नांदेड ग्रामीण येथील हद्दपार असलेल्या आरोपी परत आपल्या घरी येत आहेत का त्यांचे घरोघरी जाऊन पाहणी केली.
- गुन्हा दाखल तारीख: 16.11.2025
- पहाटे 3 वाजता पासून मोठी ऑपरेशन मोहीम सुरू
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ग्रामीण विभागात एकाच वेळी 08 विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले.
या मोहिमेत 07 संशयित इसमांचा शोध, विविध गुन्ह्यात सामील असलेल्यांचा तपास तसेच 110 संशयितांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
या कारवाईत विशाल रामेश शीतळे (वय 26, रा. ND 41विजय नगर, नांदेड) हा मुख्य आरोपी पोलीसांच्या ताब्यात घेण्यात आला.
तो अनेक गुन्ह्यात सामील असून स्थानिक परिसरात वातावरण बिघडवण्याचा त्याचा सतत प्रयत्न असल्याचे पोलिसांनी सांगितले.
- मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड
- मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक
- मा. श्री. अर्चना पाटील, उप पोलिस अधीक्षक
- मा. श्री. प्रशांत शिंदे, उपविभागीय अधिकारी
तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी व अधिकारी मोहिमेत सहभागी.
ग्रामीण भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सतत सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावे, संशयित हालचाल आढळल्यास त्वरित कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही मोठी धडक कारवाई नांदेड ग्रामीण पोलिसांकडून गुन्हेगारीला रोखण्यासाठी एक प्रभावी पाऊल म्हणून पाहिली जात आहे.












