नांदेड,०४ डिसेंबर दि. २७ नोव्हेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे सक्षम ताटे यांच्या खुनाच्या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचा धागा लागावा म्हणून आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी (पीसीआर) मंजूर करण्यात आली आहे. माननीय अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-१ सौ. राम शिंदे यांनी आरोपीला ४ ते ६ डिसेंबर या कालावधीपर्यंत पीसीआर देण्याचा आदेश दिला.
या सुनावणीदरम्यान पोलिसांनी न्यायालयास सांगितले की, आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करणे आवश्यक आहे. तसेच त्या मोबाईलचा इतर कोणत्या गुन्ह्यात वापर झाला आहे का, याचीही तपासणी करण्यात येणार आहे. आरोपीने वापरलेली मोटरसायकलही जप्त करणे तपासाच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
गुन्ह्याच्या उकल आणि आरोपीच्या गुन्हेगारी कनेक्शनचा तपास जलदगतीने व्हावा, यासाठी दोन दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने याला मान्यता देत आरोपीला २ दिवसांची पीसीआर मंजूर केला.
समक्ष ताटे हत्या प्रकरणात पोलिस महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नात असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.












