नांदेड, दि.06 डिसेंबर 27 (प्रतिनिधी) माधव वाघमारे 06नोव्हेंबर 2025 सक्षम ताटे हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी महत्त्वाची पावले उचलत सहा आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने यातील चार आरोपींना थेट MCR (Magisterial Custody Remand) तर दोन आरोपींना PCR (Police Custody Remand) असा आदेश दिला आहे.
🔹 थेट नांदेड जिल्हा कारागृहात रवानगी
खून प्रकरणातील पुढील आरोपींना न्यायालयाने MCR सुनावून थेट नांदेड जिल्हा कारागृहात पाठवले आहे :
- गजानन मामीलवाड
- साहिल ठाकूर मामीलवाड
- सोमेश लखे
- वेदांत कुदळेकर
या चौघांच्या ताब्यातून पोलिसांना आणखी माहिती मिळवण्याची गरज नसल्याचा निष्कर्ष निघाल्याने न्यायालयाने त्यांना कारागृहात धाडले.
🔹 दोन आरोपींना पोलिस कोठडी
खूनाच्या तपासात अजून पुरावे गोळा करण्याची आवश्यकता असल्याने पुढील आरोपींना न्यायालयाने PCR सुनावली आहे :
- अमन देवदास शिरसे – 9 दिवसांची PCR
- आदित्य रामदास सीनमनकर – 10 डिसेंबरपर्यंत PCR
दोन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली साधने, मोबाईलची तपासणी तसेच इतर पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांकडून तीव्र चौकशी करण्यात येणार आहे.
🔹 प्रकरणावर सर्वत्र लक्ष
सक्षम ताटे यांच्या खुनानंतर संपूर्ण जगभरात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा तपास पोलीस जलदगतीने करत आहेत. आरोपींची भूमिका, गुन्ह्याचे नियोजन, वापरलेली वाहने व संवाद याबाबत सखोल तपास सुरू आहे.
पुढील काही दिवसांत PCR मधील तपासातून महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












